शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनसाठी केंद्र सरकारने राज्याला शिफारस करावी

By admin | Updated: October 17, 2016 01:51 IST

एक लाख वीज कामगारांना पेन्शन लागू करण्याचा ठराव १९९६ साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने घेतला होता

मुंबई : तत्कालीन विद्युत मंडळाच्या तिन्ही वारस कंपन्यांतील सुमारे एक लाख वीज कामगारांना पेन्शन लागू करण्याचा ठराव १९९६ साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने घेतला होता. मात्र दुर्दैवाने २० वर्षे उलटली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता केंद्रात व राज्यात एकच सरकार असल्याने केंद्राने राज्याला वीज कामगारांना पेन्शन लागू करण्याबाबतची शिफारस करावी, असे निवेदन केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन यांनी दिली.४ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर २० आॅक्टोबर रोजी संचालक स्तरावर मागण्यांबाबत बैठक होणार आहे. बैठकीत महावितरणमधील यंत्रचालकांच्या पदोन्नतीचा मार्ग खुला करणे, लाइनस्टाफला आठ तास काम देत अतिरिक्त कामाचा मोबदला देणे, वीज कामगारांच्या मुलांना एसटी महामंडळाप्रमाणे सरळ भरतीत ५ टक्के आरक्षण देणे; यांसह २० मागण्यांवर चर्चा करण्यात येईल, असे जहिरोद्दिन यांनी सांगितले. महावितरणमधील विद्युत सहायकाच्या भरतीत प्रतीक्षा यादीतील ३, ५०० विद्युत साहाय्यकांना दिवाळीपूर्वी नियुक्ती देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. मात्र या साहाय्यकांना नियुक्ती देण्यापूर्वी कार्यरत असलेल्या विद्युत साहाय्यकांना त्यांच्या विनंतीनुसार प्रादेशिक कार्यालयांतर्गत निवासी क्षेत्रात बदली करण्यात यावी; आणि प्रतीक्षा यादीतील विद्युत साहाय्यकांना रिक्त जागांवर नियुक्त देण्यात यावी, ही प्रमुख मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>९६ हजार वीज कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याबाबतची घोषणा १९ आॅक्टोबर रोजी होणार आहे. १९ आॅक्टोबर रोजी संघटनेची मुख्यालयात बैठक होणार आहे. मात्र मागील ७ वर्षांच्या प्रथेप्रमाणे गतवर्षीच्या रकमेत एक हजार रुपयांची वाढ होणार की ही प्रथा बदलून यापेक्षा अधिक रकमेची घोषणा होणार? याकडे वीज कामगारांचे लक्ष लागले आहे.