शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-भिवंडी आठ पदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:55 IST

ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली. मंगळवारी मंजूर झालेल्या योजनांत औरंगाबाद-जळगाव-जालना मार्गाचाही समावेश आहे. सातारा-कागल रस्ता सहापदरी करण्याच्या तीन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही त्यांनी मान्यत दिली आहे.महाराष्ट्रातील खासदारांशी चर्चा करताना गडकरी यांनी स्पष्ट केले की ठाणे-भिवंडी आठपदरी रस्त्याच्या निविदा काढण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण केले जाईल व तीन महिन्यांत कामाला प्रारंभही होईल. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री मदन एरावार, खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग वारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि मंत्रालय सचिव युद्धवीर सिंह मलिक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, कल्याण-ठाणे-मुंबई जलमार्गासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रारंभी ५०० कोटी रुपयांची निविदा काढली जाईल. या कामासाठी केंद्र आणि महापालिका एक-एक हजार कोटी रुपये खर्च करतील.४५ हजार कोटींची कामे सुरू-बैठकीत टोल आणि टोलनाक्यांचा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर नितीन गडकरी यांनी सांगितले की, ७५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांत ६५ हजार कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिलीआहे व त्यातील ४५ हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रारंभही झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.कामे वेगात होणारकोल्हापूरचा कागल-सातारा मार्ग सहापदरी करण्यासाठी महाराष्ट्र विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील तांत्रिक विसंगतींनाही दूर केल्या आहेत. रस्त्याचे काम तीन महिन्यांत सुरू केले जाईल व निविदांचे काम महिन्याभरात पूर्ण केले जाईल. औरंगाबाद-जळगाव-जालना मार्गाचे कामही मंजूर करण्यात येत असून प्रकल्पांची कामे वेगात पूर्ण होतील.