शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अभिनय कट्ट्यावर रंगला उत्सव लावण्यांचा

By admin | Updated: September 22, 2016 03:34 IST

नृत्यांगना माधुरी आचरेकर - चव्हाण हिने सादर केलेल्या दिलखेच अदाकारीने भरलेल्या लावण्यांचा उत्सव ठाणेकरांनी अभिनव कट्ट्यावर अनुभवला.

ठाणे : ठाण्यातील नृत्यांगना माधुरी आचरेकर - चव्हाण हिने सादर केलेल्या दिलखेच अदाकारीने भरलेल्या लावण्यांचा उत्सव ठाणेकरांनी अभिनव कट्ट्यावर अनुभवला. तिच्या प्रत्येक सादरीकरणाने लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाला थिरकायला भाग पाडले. ‘कुठं तुम्ही गेला होता’, ‘लाल पैठणी रंग माझ्या चोळीचा’, ‘भरलं आभाळ’ अशा अनेक लावण्यांचे सादरीकरण यावेळी झाले.या कट्ट्याचे दुसरे वैशिष्टय म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीमध्ये उभे केलेले सुरेख नेपथ्य, प्रकाशयोजना, गणेश गायकवाड याचे निवेदन व कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केलेली बतावणी हे ठरले. बतावणीच्या माध्यमातून सध्याचे महाराष्ट्रातील विविध प्रश्न मिश्किलपणे मांडण्यात आले आणि या प्रश्नांचा सर्वसामान्यांनी, प्रशासन व नेते मंडळीनी विचार करावा असे प्रबोधनात्मक भाष्य देखील केले. योगेश मंडलिक, स्वनिल काळे, वैभव चव्हाण, प्रतीकेश मोरे, नवनाथ कंचार, वैभव जाधव याच सोबत लावणीसाठी श्रावणी कदम, शिवानी देशमुख, शिल्पा लाडवंते, वीणा छत्रे, अश्विनी जगताप, सई कदम यांनी सुद्धा लावण्या सादर करून तिला साथ दिली. ‘उत्सव लावण्यांचा’ या कार्यक्र माची संकल्पना व दिग्दर्शन किरण नाकती यांचे होती. या कार्यक्र माअंती लावण्यवती माधुरी हिचा व तिच्या ज्या कुटुंबीयांनी आजपर्यंत तिला साथ दिली त्यांचा सत्कार करण्यात आला.>माधुरीच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला उत्सव लावण्यांचा या कार्यक्रमातून २९० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्याची सुरु वात झाली.अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून येवून तिने आपली अंगीभूत कला गेली २२ वर्ष सादर करून अनेक रसिक मायबापांचे फक्त मनोरंजनच नाही तर खऱ्या अर्थाने लावणीचा अर्थ आपल्या प्रत्येक सादरीकरणातून दाखवून दिला.‘भरलं आभाळ’ या लावणीने तिने सुरु वात केली.प्रत्येक अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकत ‘कुणीतरी बोलवा दाजीबाला’ या माधुरीने स्वत: फेटा नेसून केलेल्या लावणीमुळे रसिक मायबापांची वन्स मोअर ची दाद सुरू झाली.‘प्रीतीच्या झुल्यात झुलवा’ ते ‘नाद खुळा’ या सर्वच माधुरीच्या दिलखेच लावण्यांचा आनंद लुटला. प्रत्येक लावणीनंतर टाळ््यांचा कडकडाट आणि वन्स मोअरची दाद हे सुरूच होते.