शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीआय’चा कापूस खरेदीला खो!

By admin | Updated: November 20, 2015 02:09 IST

दिवाळीही गेली; शेतक-यांना खरेदीची प्रतीक्षा.

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यात कापूस खरेदीला अद्याप म्हणावा तसा वेग आला नसून, खासगी बाजारात आतापर्यंत जवळपास १४ लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी विकला आहे. पणन महासंघाकडेही कापसाची आवक संथ गतीने असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे लक्ष भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदीकडे लागले आहे; परंतु सीसीआयने कापूस खरेदीला खो दिल्याने त्याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. यावर्षी कापसाला प्रतिक्विंटल ४१00 रुपये भाव जाहीर झाला आहे. पणन महासंघाकडून हमीदरानुसार कापसाची खरेदी केली जात आहे. मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास महांसघाचा (नाफेड) उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केली; परंतु गतवर्षी केंद्र सरकारने नाफेडशी करार न केल्याने सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात येत आहे. यावर्षी सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघ राज्यात कापूस खरेदी करीत आहे. गतवर्षी सीसीआयने देशात ३३५ व महाराष्ट्रात ७0 च्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करून, ८६.९0 लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. पणन महासंघाने ११५ खरेदी केंद्र सुरू केली होती. यावर्षी पणन महासंघाने २0 पेक्षा जास्त कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. सीसीआय दिवाळीनंतर खरेदी सुरू करणार होते; परंतु सीसीआय देशभरातील त्यांच्या १४ प्रादेशिक कार्यालयांकडून कापूस उपलब्धतेची माहितीच गोळा करीत आहे. १४ पैकी ३ प्रादेशिक कार्यालयांनी खरेदी सुरू करण्यासाठीची अनुमती मागितली; तथापि महाराष्ट्रात अद्याप या विषयावर माहिती गोळा करणेच सुरू असल्याने कापूस खरेदीला सीसीआयकडून विलंब होत आहे. कापसाचे हमीदर प्रतिक्विंटल ४१00 रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून कापूस खरेदी केल्या जात असल्याने शेतकर्‍यांना प्रत्यक्षात ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. सीसीआय थेट कापूस खरेदी करीत असल्याने शेतकरी सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावीत, या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, प्रक्रियेसाठी लागणारा कापूस व उपलब्धता, यासाठी सीसीआयच्या देशातील १४ प्रादेशिक कार्यालयाकडून माहिती गोळा केली जात असून काही प्रादेशिक कार्यालयांनी कापूस खरेदीसंदर्भात माहिती पोहोचवली आहे. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू होतील, असे सीसीआयचे महादेव कुंभार यांनी स्पष्ट केले.