शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयची राहुल मुखर्जीकडे चौकशी

By admin | Updated: November 23, 2015 02:10 IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तिचा प्रियकर राहुल मुखर्जी याच्याकडे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सखोल चौकशी केली

मुंबई: बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तिचा प्रियकर राहुल मुखर्जी याच्याकडे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सखोल चौकशी केली. त्याचे वडील पीटर मुखर्जीचा खुनात सहभागासंदर्भात विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पीटर मुखर्जीच्या सीबीआय कोठडीची मुदत सोमवारी संपत असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आपले वडील पीटर या प्रकरणात निर्दोष असून, तपास अधिकाऱ्यांना आपण हेच सांगितल्याचा दावा राहुल मुखर्जीने पत्रकारांशी बोलताना केला.आतापर्यंत या प्रकरणी तिची आई इंद्राणी, संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामकुमार राय यांना अटक झालेली आहे. सध्या तिघांना ३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली. शीनाच्या हत्येचा कट आणि त्यानंतरही माहिती असूनही वाच्यता न केल्याचा पीटर मुखर्जीवर आरोप आहे. त्या अनुषंगाने त्याची गेली दोन दिवस चौकशी करण्यात येत आहे. रविवारीही त्याला याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याचबरोबर त्याचा मुलगा व शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी यालाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. शीनाबाबत पीटरचे काय मत होते? त्यांच्यातील संबंधाला त्याचा का विरोध होता? शीना बेपत्ता असल्याबाबत काय माहिती दिली, आदी प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. चौकशीनंतर राहुल मुखर्जीला पत्रकारांनी विचारल्यावर तो म्हणाला, ‘याबाबत आपण सर्व माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. पिता पीटर मुखर्जी यांचा हत्येशी संबंध असण्याची शक्यता नाही. ते निर्दोष असून, संशयितांकडून त्यांना जाणीवपूर्वक गुंतविले जात असावे, असे आपण चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जबाब दिला,’ असे सांगितले. (प्रतिनिधी)