शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीची सीबीआय चौकशी करा : चव्हाण

By admin | Updated: May 23, 2017 04:18 IST

राज्यात कमी किमतीत आयात केलेली तूर आधारभूत किमतीने शेतकऱ्यांच्या नावावर विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कमी किमतीत आयात केलेली तूर आधारभूत किमतीने शेतकऱ्यांच्या नावावर विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. या संपूर्ण घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्र परिषदेत केली. ते म्हणाले की, तुरीचे विक्रमी उत्पादन झाले असताना तुरीची खरेदी पारदर्शक पद्धतीने करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करून चव्हाण म्हणाले की, सरकारच्या आकडेवारीनुसार खरीप २०१५ हंगामात महाराष्ट्रात १२.३७ लाख हेक्टर जमिनीवर तूर लावली गेली आणि त्यामधून ४.४४ लाख टन तूर डाळीचे उत्पादन झाले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि शेतकऱ्यांना गेल्यावर्षी मिळालेल्या वाढीव हमी भावामुळे शेतकऱ्यांनी २०१६च्या खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक म्हणजेच १५.३३ लाख हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड केली. मात्र,राज्य सरकारच्या उत्पादनाच्या आकडेवारीवरुन कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका चव्हाण यांनी व्यक्त केली.राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ मध्ये जाहिर केलेल्या उत्पादनाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील डाळींचे उत्पादन १२.५६ लाख टन होईल असे जाहिर केले. मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विधानसभेत ११.७१ लाख टन उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली. एप्रिलमध्ये राज्यातील तूरीचे उत्पादन २०.३५ लाख टन होईल असे केंद्र्र सरकारला कळविण्यात आले. त्यामुळे तीन महिन्यात ११.७१ लाख टनावरुन २०.३५ लाख टन कसे वाढले, असा सवाल चव्हाण यांनी केला.