शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते घोटाळा तपासासाठी सीबीआयची मदत

By admin | Updated: July 29, 2016 02:04 IST

मुंबई महापालिकेच्या रस्त्यांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत आवश्यकता भासल्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग(सीबीआय)ची मदत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रस्त्यांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत आवश्यकता भासल्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग(सीबीआय)ची मदत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्या रस्त्यांच्या कामात कंत्राटदार, पालिकेतील उच्चपदस्थ अधिकारी यांच्या संगनमताने कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा मुद्दा काँग्रेसचे नारायण राणे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, ‘मुंबई महापालिकेकडून ५ कोटींवरील रस्त्यांची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ५ रस्त्यांची चौकशी सुरू असून, आणखी सुमारे २०० रस्त्यांची चौकशी करण्यात येईल. आत्तापर्यंतच्या चौकशीतून पालिकेचे १४ कोटींचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांबाबतची चौकशी पारदर्शकपणे करण्यात आली असून, दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात पोलीस स्थानकात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे, तर दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन मुख्य अभियंते, चार दुय्यम अभियंते आणि सुमारे १२ स्वतंत्र लेखापालांवर कारवाई करण्यात आली आहे,’ अशी माहिती पाटील यांनी दिली. कामे देण्याची प्रक्रिया प्रचलित नियमांनुसार झाली आहे, तसेच या प्रक्रियेमध्ये किंवा कामे देण्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. कंत्राटदारांना आधीच कामे देण्यात आली असल्याने आता ती कामे रद्द करता येणार नाहीत. या कामांतील अनियमिततेबाबत संबंधित सर्वांची चौकशी करण्यात येत असून, कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)१४ कोटींचे नुकसानचर्चेला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, ‘मुंबई महापालिकेकडून ५ कोटींवरील रस्त्यांची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ५ रस्त्यांची चौकशी सुरू असून, आणखी सुमारे २०० रस्त्यांची चौकशी करण्यात येईल. आत्तापर्यंतच्या चौकशीतून पालिकेचे १४ कोटींचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे.’