शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सतीश शेट्टी खून प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

By admin | Updated: August 12, 2014 01:41 IST

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरण बंद करावे, असा प्रस्ताव सीबीआयच्या पुणे विभागाने मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयात सोमवारी दुपारी दाखल केला.

पिंपरी-चिंचवड : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरण बंद करावे, असा प्रस्ताव सीबीआयच्या पुणे विभागाने मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयात सोमवारी दुपारी दाखल केला. गेली साडेचार वर्र्षे सुरू असलेल्या या खून प्रकरणातील आरोपीपर्यंत सीबीआयला पोहोचता आले नाही, यावरून माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील सतीश भोजा शेट्टी (३९) यांनी माहिती अधिकार कायद्याच्या मध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले होते. त्यांची १३ जानेवारी २०१० रोजी भंडारी हॉस्पिटल समोर अज्ञातांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने ३ महिने याचा तपास केल्यानंतर हे प्रकरण जुलै २०१०मध्ये सीबीआय आकुर्डी पुणे येथे वर्ग केले. सोमवारी दुपारी वडगाव न्यायालयाचे न्यायाधीश महिपाल बिहारे यांच्या समोर या प्रकरणात आरोपी सिद्ध होत नसल्याने प्रकरण बंद करण्याचा प्रस्ताव सादर झाला. हे प्रकरण वडगाव न्यायालयातून पुणे सत्र न्यायालयात जाऊन निर्णय होणार आहे. रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी व आयआरबी कंपनीचे मालक यांचे संबंध असल्याने तपासावर दबाब आणल्यानेच सीबीआय प्रकरण बंद करण्याचा अर्ज न्यायालयात सादर केला गेला. आरोपींना पकडून शिक्षा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढाई लढणार आहे, असे शेट्टी यांचे भाऊ संदीप म्हणाले. (प्रतिनिधी)