शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कावळोबांच्या साक्षिने बायकोंच्या विचारांचे ‘हवन’

By admin | Updated: March 7, 2017 21:25 IST

पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित पतींसाठी उभारलेल्या ‘पत्नी पीडित पुरूष आश्रमा’ची भरणी आणि पुजन महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर हटके पद्धतीने करण्यात आले

सोमनाथ खताळ

औरंगाबाद, दि, 7 - पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित पतींसाठी उभारलेल्या ‘पत्नी पीडित पुरूष आश्रमा’ची भरणी आणि पुजन महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर हटके पद्धतीने करण्यात आले. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या पीडित पतींनी बायकोने दिलेल्या त्रासाचे वाचन आणि हवन केले. यावेळी कावळोंबांना प्रेरणास्थान व साक्ष म्हणून जवळ ठेवण्यात आले होते. आगळा-वेगळा हा सोहळा मंगळवारी बॉम्बे हायवेवर औरंगाबादपासून जवळच असलेल्या साजापुर येथे पार पडला.

मागील काही दिवसांपासून पत्नीच्या त्रासामुळे अनेक पतीराज त्रस्त आहेत. पोलीस केसेस, न्यायालयीन खेटे, मारहाण अशा अनेक प्रकारांमुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. दिवसेंदिवस हे अन्याय वाढत चालल्याने पत्नीने १४७ दाखल केलेल्या औरंगाबादमधील भारत फुलारे यांनी पत्नी पीडित पुरूष आश्रम उभारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरूष दिनाचे औचित्य साधून १९ नोव्हेंबर रोजी या आश्रमाची स्थापना करण्यात आली. बांधकामही झाले.

परंतु या आश्रमाच्या पुजनासाठी त्यांना हवा होता एक चांगला मुहूर्त. महिलांपासूनच आपल्याला त्रास झाला आहे. त्यामुळे त्यांच्या दिनाचे औचित्य साधुनच या आश्रमाचे पुजन करण्याचे ठरविले. मंगळवारी या आश्रमाचे पुजनही करण्यात आले. याठिकाणी होम (अग्नि असलेला) करण्यात आला. परंतु हा होममध्ये कसलाही धार्मिक विधी करण्यात आला नाही. राज्यासह परराज्यातून आलेल्या पीडित पतींनी बायकोने दिलेल्या त्रासाचे एका कागदावर लिखाण केले. ते कावळोबांचे आशिर्वाद घेऊन सर्वांसमोर वाचण्यात आले. त्यानंतर त्या चिठ्ठीला होममध्ये टाकण्यात आले. असा हा आगळा वेगळा कार्यक्रम मंगळवारी मोठ्या थाटात पार पडला. यावेळी आलेल्या सर्व पत्नी पीडितांसाठी भंडाऱ्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता. सर्वत्र रांगोळी आणि फुलांचे तोरण लावण्यात आले होते. त्यामुळे परिसर फुलून गेला होता.

शहरातून वाहन दिंडीपुजनाच्या पूर्वी सकाळी दहा वाजता औरंगाबाद शहरातून वाहन दिंडी काढण्यात आली. यामध्ये शेकडो पत्नी पीडित सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात आणि दुचाकीच्या समोर वेगवेगळ्या मागण्या असलेले फलक लावण्यात आले होते. विशेष म्हणजे दिंडीच्या समोर तीन चाकी वाहनावर कावळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही का उभारली हे कोणाला समजत नसले, तरी ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कोणी विचार करीत होते, तर कोणी हसून पुढे जात होते. सीडको बसस्थानकापासून निघालेली ही दिंडी बाबा पेट्रोलपंप मार्गे आश्रमात पोहचली.

कावळोंबाना का मानले प्रेरणास्थान?सर्वांनाच प्रश्न पडला होता, की कावळोंबाची प्रतिकृती आणि प्रतीमा प्रत्येक ठिकाणी का लावली असेल. तर यावर अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले, मादी कावळा अंडे देते, आणि निघून जाते. त्यानंतर सर्व जबाबदारी ही नर कावळ्यावर येते. मादी कावळ्याला कसलीही काळजी नसते. पण तरीही कावळा डगमगत नाही. अशीच काहीशी परिस्थिती पत्नी पीडितांची आहे. त्यामुळे कावळ्याला प्रेरणास्थान मानून प्रत्येक कार्य आणि कार्यक्रम करतो.

काय आहेत मागण्या?स्त्री-पुरूष समान कायद्याची पुरूषांसाठीही अंमलबजावणी करा, पत्नी पीडित पुरूषांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करा, मुलांना ढाल बनवून न्यायालयात वापर करणाऱ्या स्त्रियांवर कारवाई करा, स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही पोटगी लागू करा, महिलांप्रमाणे पुरूषांनाही न्यायालयीन फिस माफ करा, अशा विविध मागण्यांचे फलक यावेळी रॅलीत हाती घेण्यात आले होते.