शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

कपाशीचे दोन रसशोषक कीड प्रतिबंधक वाण विकसित!

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विकसित वाण, दक्षिण भारत व महाराष्ट्रासाठी शिफारस.

राजरत्न सिरसाट / अकोलाअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने रसशोषक कीड प्रतिबंधक क पाशीचे दोन नवे वाण विकसीत केले असून, बीटी कापसाएवढेच उत्पादन अपेक्षित असलेल्या यातील एका वाणाची खास दक्षिण भारतासाठी, तर दुसर्‍या वाणाची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. या दोन्ही वाणांना संयुक्त संशोधन समितीने मान्यता दिली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक देशी व अमेरिकन वाण विकसीत केले आहेत. त्यापैकी ह्य४६८ह्ण या वाणाने देशातील कापूस उत्पादनात क्रांती केली आहे; तथापि अलीकडे कपाशीवर रस शोषण करणार्‍या किडींचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशकांचा वापर वाढल्याने, शेतकर्‍यांच्या खर्चात दुपटीने वाढ झाली. यावर उपाय म्हणून, कृषी विद्यापीठाने रसशोषक किडीला प्रतिबंधक असे ह्यएकेएच-९९१६ह्ण हे नवे (अमेरिकन) सरळ वाण विकसीत केले आहे. कोरडवाहू क्षेत्रात सुमारे १७0 ते १८0 दिवसात पीक हाती येणार्‍या या वाणाचे प्रति हेक्टरी अपेक्षित उत्पादन १२ ते १४ क्विंटल एवढे आहे. या वाणाची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाने ह्यएकेएच २00५-0३ह्ण हे दुसरे नवे देशी कापसाचे वाण दक्षिण भारतासाठी विकसित केले आहे. कोरडवाहू क्षेत्रात प्रति हेक्टरी ८ ते १0 क्विंटल कापसाचे उत्पादन देणारे हे वाण आखूड धाग्याचे असल्याने, या कापसाचा वापर वैद्यकीय उपयोगासाठी (सजिर्कल कॉटन) होईल. *बीटीला पर्याय ठरणार! गत काही वर्षात देशभर बीटी कापसाचे प्रस्थ वाढले असून, जवळपास एक कोटी वीस लाख हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाची पेरणी केली जात आहे. बीटी कापूस बोंडअळीला प्रतिबंध करतो; तथापि बीटी कपाशीवर रसशोषक किडीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. त्यासाठी किटकनाशकांची फवारणी करावी लागते; परंतु ह्यएकेएच-९९१६ह्ण हे वाण रसशोषक किडीला प्रतिबंधक असल्याने, या कापसाचा पेरा वाढेल, अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे.