शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’ सेवा रेल्वेला फायदेशीर

By admin | Updated: January 12, 2017 06:43 IST

नोटाबंदीनंतर लोकलचा पास काढण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आली.

मुंबई : नोटाबंदीनंतर लोकलचा पास काढण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आली. उपनगरीय लोकल स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर पास काढण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाइप करून पासाचे शुल्क भरण्यासाठी पीओएस मशिन बसवण्यात आल्या. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून १५ दिवसांत ९७ लाखांची कमाई झाली आहे. रेल्वेने मेल-एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी स्थानकांवर टप्प्याटप्प्यात कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिन बसवण्यास सुरुवात केली. या मशिन बसवल्यानंतर लोकल प्रवाशांनाही पास काढण्यासाठी ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेवर ६२४ तर पश्चिम रेल्वेवर ३२४ मशिन बसवण्यात आल्या. २६ डिसेंबरपासून जरी ही सेवा सुरू करण्यात आली असली तरी त्याला २७ डिसेंबरपासून लोकल प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. गेल्या १५ दिवसांत मध्य रेल्वेवर ८ हजार १८५ प्रवाशांनी पास काढण्यासाठी पीओएस मशिनचा लाभ घेतला. तर पश्चिम रेल्वेवर २ हजार ९१८ प्रवाशांनी या मशिनचा वापर केल्याची माहिती मुंबईतील रेल्वेच्या क्रिस संस्थेचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. मध्य रेल्वेला जवळपास ६५ लाख २६ हजार तर पश्चिम रेल्वेला ३२ लाख १० हजारांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. (प्रतिनिधी)स्वतंत्र खिडकीची मागणीया सेवेचा पासधारकांना सोडून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मात्र थोडा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पासाचे पैसे भरावे लागत असल्याने त्या प्रक्रियेसाठी साधारपणे दोन ते तीन मिनिटांचा अवधी लागतो. कधी कधी नेटवर्कची समस्या उद्भवल्याने तो कालावधी वाढतो. त्यामुळे रांगेत तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मात्र ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे कॅशलेस सुविधेसाठी स्वतंत्र तिकीट खिडक्यांची मागणी प्रवाशांकडून होत आहे.