शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात फटाके फोडून रौप्यपदकाचा आनंदोत्सव

By admin | Updated: August 19, 2016 23:07 IST

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत रौप्यपदक मिळविण्यासह भारताला आणखी एक आॅलिम्पिक पदक मिळवून दिल्याबद्दल जळगावात फटाके फोडून व तिरंगा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा

पी.व्ही.सिंधूचे कौतुक : स्टेडियम समोर व काव्यरत्नावली चौकात जल्लोषजळगाव : भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत रौप्यपदक मिळविण्यासह भारताला आणखी एक आॅलिम्पिक पदक मिळवून दिल्याबद्दल जळगावात फटाके फोडून व तिरंगा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे जगातील क्रमांक एकची महिला बॅडमिंटन खेळाडू स्पेनची कॅरोलिना मारिन हिला शेवटपर्यंत झुंजविल्याबद्दल सिंधूचे क्रीडा संघटना व शहरवासीयांच्यावतीने विशेष कौतुक केले जात आहे. सामना पाहण्यासाठी गर्दीसंधूने उपांत्यफेरीत जपानच्या नोजोमी ओकुहारा हिचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. सुवर्णपदकासाठी तिची लढत स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी शुक्रवारी संध्याकाळी सुरू होताच शहरात सर्वत्र क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी दुकानांवर, पान टपरींवर टि.व्ही. समोर थांबून अनेकजण समुहाने हा सामना पाहत होते. या सोबतच अनेक घरांमध्येही शहरवासीय हा सामना पाहत असल्याने संध्याकाळपासूनच रस्त्यावर काहीसी वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत होते. पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतल्याने आशा उंचावल्यापहिल्या सेटमध्येच सिंधूने आघाडी घेताच सर्वत्र जल्लोष करण्यात येऊ लागला. त्यानंतर मात्र दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये ती मागे पडली व मारिनने बाजी मारली. यामुळे सुवर्ण पदक हुकले तरी सिंधूने रौप्य पदकावर आपले नाव कोरुन भारताला या आॅलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवून दिल्याबद्दल शहरात मोठा जल्लोष करण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणलाया वेळी काव्यरत्नावली चौक तसेच जिल्हा क्रीडा संकुलनजीक जैन स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी तसेच युवाशक्ती फाउंडेशनच्यावतीने फटाके फोडून तसेच तिरंगा झेंडा फडकावून प्रचंड जल्लोष करण्यात आला. तसेच भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या वेळी जैन स्पोर्टस्चे फारुक शेख, नरेंद्र चव्हाण, प्रवीण ठाकरे, विवेक अळवणी, समीर शेख, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, राहुल चव्हाण, भूषण सोनवणे, तेजस श्रीश्रीमाळ, विपीन कावडिया, समीर कावडिया, सागर जगताप, हर्षल भोलाणे, रघुनाथ राठोड, विशाल जोशी आदी उपस्थित होते. या सोबतच शहरात वेगवेगळ््या ठिकाणी सामना पाहण्यासाठी एकत्र आलेल्यांनीदेखील जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

प्रतिस्पर्धीला शेवटपर्यंत झुंजविले.....सुवर्ण पदक हुकले असले तरी निराशा नसून तिच्या कामगिरीचे कौतुकच केले पाहिजे, असे फारुक शेख, विवेक अळवणी यांच्यासह क्रीडा प्रेमींनी सांगितले. या बाबत सोशल मीडियावरदेखील सिंधूचे कौतुक केले जात होते. लंडन २०१२ च्या आॅलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक मिळविले होते. यंदा सिंधूची कामगिरी त्याहून सरस ठरली असून बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवून देणारी ती पहिली महिला खेळाडू ठरल्याचाही उल्लेख या वेळी क्रीडाप्रेमींनी केला.