शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

उम्रद येथे पूरात वाहून युवकाचा मृत्यू

By admin | Updated: July 15, 2016 17:03 IST

तालुक्यातील उम्रद येथील दमणगंगा नदीपात्रात पूरात वाहून गेल्याने एका तीस वार्षिय युवकाचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतपेठ, दि. 15 - तालुक्यातील उम्रद येथील दमणगंगा नदीपात्रात पूरात वाहून गेल्याने एका तीस वार्षिय युवकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उम्रद येथील सदू पांडू भूसारे वय- 30 हा पेठहून बाजार करून घराकडे जात असतांना दमणगंगा नदीवरील पूलावरून पाण्यातून वाट काढीत जात असतांना पूलाचे कठडे पुरामूळे वाहून अंदाज न आल्याने पाय घसरून पूरात वाहून गेला. सायंकाळ पर्यंत सदू घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा रात्रभर कोठेही तपास लागला नाही. दुसऱ्या दिवशी नजिकच्या बोंडारमाळ गावाजवळ नदीकाठी भूसारे याचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. पेठ पोलिसांना खबर दिल्याने पोलीस निरिक्षक विजय सोनवणे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. पेठच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उम्रद येथील स्मशान भूमीत सदू भूसारे यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणाऱ्या दमणगंगा नदीवरच्या पुलाचे संरक्षक कठडे पहिल्याच पूरात वाहून गेल्याने या पूलावरून पावसाळ्यात पूराचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून या पूलावरून ये जा करावी लागत असल्याने संबंधित विभागाने या पूलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे (वार्ताहर)