शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार शिरली माजी मंत्र्यांच्या बंगल्यात

By admin | Updated: May 28, 2016 14:43 IST

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या रामदासपेठेतील बंगल्यात धडकलेल्या एका भरधाव कारने काही वेळेसाठी चांगलीच खळबळ उडवून दिली

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २८ - : माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या रामदासपेठेतील बंगल्यात धडकलेल्या एका भरधाव कारने काही वेळेसाठी चांगलीच खळबळ उडवून दिली. या कारने वडेट्टीवार यांच्या बंगल्याच्या गेटची मोडतोड केली अन् नंतर आलिशान होंडा कारला धडक देत सात ते आठ लाखांचे नुकसान केले. 
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामदासपेठमध्ये माजी मंत्री वडेट्टीवार यांचा आलिशान बंगला आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी  भरधाव वॅगनआर (एमएच ४३ / एएफ २८१७) कार त्यांच्या बंगल्याचे दार तोडून आत शिरली. कारने दर्शनी भागातील गार्डनचे कठडे तोडल्यानंतर बाजूला असलेल्या होंडा कार (एमएच ३१/ ०२३४) ला जोरदार धडक मारली. या धडकाधडकीचा आवाज ऐकून आतमधील कर्मचारी बाहेर धावले. त्यांनी वॅगनआरचा चालक आरोपी मनोज बबनराव वडे (वय ३०, रा. झिंगाबाई टाकळी) याला पकडले. नंतर सीताबर्डी ठाण्यात राहूल ठाकरे नामक कर्मचा-याने माहिती दिली. पीएसआय नागरे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामादी केला. आरोपी मनोजला ताब्यात घेतले. या घटनेनंतर वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरील निलेश सीताराम हरले यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून  सीताबर्डी पोलिसांनी आरोपी मनोज वडेला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली.