शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांचे कॅप्टन आणि टीम

By admin | Updated: February 14, 2017 01:00 IST

रामदासभाई (त्यांना प्रेमाने भाई म्हणतात. उगाच भाई या शब्दाचा गैरअर्थ कोणीही काढू नये. हल्ली शब्दही बदनाम होत चालले आहेत, म्हणून हा खुलासा) कदम

रामदासभाई (त्यांना प्रेमाने भाई म्हणतात. उगाच भाई या शब्दाचा गैरअर्थ कोणीही काढू नये. हल्ली शब्दही बदनाम होत चालले आहेत, म्हणून हा खुलासा) कदम हे अतिशय म्हणजे अतिशयच स्पष्टवक्ते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून रामदासभाई खिशात राजीनामा ठेवून आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये राहणे अजिबातच मान्य नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी राजीनामा देता यावा, यासाठी त्यांनी ते पत्र तयार ठेवलेय. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे इतर मंत्री राजीनामा देतील की नाही, हे सांगता येत नाही, पण अत्यंत स्वाभिमानी, ताठ मानेने सर्वत्र फिरणारे रामदासभाई मात्र, नक्कीच राजीनामा देणार आहेत. त्यांच्यासारखे स्वाभिमानी, अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेले, भ्रष्टाचाराच्या विरोधात गेली अनेक वर्षं लढणारे, गुंडांचा सतत सामना करणारे नेते आणि कर्दनकाळ यापुढे फडणवीसांच्या सरकारमध्ये राहूच शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुंडांचे कॅप्टन आहेत, असे रामदासभार्इंनी जाहीर केल्यानंतर, ते स्वत: गुंडांच्या कॅप्टनसोबत काम करूच शकणार नाहीत. नाही दिला राजीनामा तर त्यांची प्रतिमा बिघडेल की!नाईलाज म्हणूनच गुंडांचे कॅप्टन असलेल्या फडणवीसांच्या टीममध्ये तब्बल अडीच वर्षं रामदासभाई काम करताहेत. आता मात्र, काम करणे त्यांना शक्यच नाही. खरं तर रामदासभार्इंनी फडणवीसांना गुंडांचे कॅप्टन म्हणताच, शिवसेनेच्या सर्वच स्वाभिमानी, स्वच्छ चारित्र्याच्या आणि गुंडांचे कर्दनकाळ असणाऱ्या मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामे देणे अपेक्षित होते. गुंडांच्या कॅप्टनच्या टीममध्ये काम करणे म्हणजे, स्वत:वर कलंक लावून घेणेच या शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी... पण काय करणार? पक्षप्रमुख त्यांना राजीनामा द्यायला सांगतच नाहीत. त्यामुळे सेनेच्या इतर मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांचा आदेश मानावा की, रामदासभार्इंच्या या खणखणीत आणि सडेतोड आरोपानंतर राजीनामा द्यावा, हे कळेनासे झाले आहे. रामदासभाई म्हणजे, समर्थ रामदासांनी लिहिल्याप्रमाणे वागणारे नेते आहेत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे...पासून ते थेटजनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे...सदाचार हा थोर सांडू नये तो...मना वासना दुष्ट कामा नये रे...मना सर्वथा पापबुद्धी नको रे...मना सर्वना नीति सोडूं नको रे...हे सारे मनाचे श्लोक त्यांना नुसतेच पाठ नसून, ते गेली कित्येक वर्षं सार्वजनिक आयुष्यात त्याचे आचरणही करताहेत. कोणाला खोटं वाटत असेल तर मालाड, कांदिवली यापासून कोकणापर्यंत कुठेही त्यांच्या कार्याची महती जाणून घ्यावी.फडणवीस महोदय, तुम्ही गुंडांचे कॅप्टन आहात, असे रामदासभार्इंनी ठरवून टाकलेय. आता तरी तुम्ही सुधरा. अन्यथा दुर्जनांचे कर्दनकाळ असलेले रामदासभाई तुमच्यातील गुंडांचा पाडावच करतील. रामदासभाई, तुम्हीही खिशातला राजीनामा पाठवून द्या एकदाचा. अन्यथा गुंडांच्या कॅप्टन असलेल्या फडणवीसांच्या टीममध्ये तुम्हीही असल्याने तुमच्यासकट सर्व शिवसेनेचे मंत्रीही गुंड आहेत, असा अर्थ काढला जाईल. ते होण्याआधी, अगदी आजच्या आज सोक्षमोक्ष लावूनच टाका.बा. सी. मर्ढेकर यांनी कवितेतजे जे म्हणविती पुढारीवेळ येता देती तुरी,सुरा पाठीत छर्रा उरीतुम्हां आम्हां असे लिहिलेय, तसे प्रत्यक्षात घडू नये, यासाठी रामदासभार्इंचा खटाटोप सुरू आहे, हे लक्षात घ्यायला हवे!

-संजीव साबडे