शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 05:56 IST

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी ३ हजार २१५ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास आज सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली.

मुंबई : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी ३ हजार २१५ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास आज सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. या अंतर्गत खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) या १२ किलोमीटरमध्ये दोन बोगदे आणि दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. खालापूर फूडमॉल ते खोपोली इंटरचेंज दरम्यान आठ पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हा द्रुतगती मार्ग एकूण ९५ किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी आहे. त्यातील खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानच्या १२ किमी लांबीचे काम हा द्रुतगती मार्ग बांधताना पर्यावरणविषयक बाबींमुळे हाती घेण्यात आले नव्हते. त्यामुळे वाहतूककोंडी होत असे. ती फोडण्यासाठी आता या दरम्यान दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. या कामांना पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत ३० नोव्हेंबर २०१५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करून तो समितीसमोर पुन्हा सादर करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)