शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षकांचा बंदिवास संपला

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

राज्यात नरभक्षक म्हणून नोंद असलेले वाघ, बिबटे व इतर वन्यपशु बंदिस्त असून त्यांचा कारावास संपविण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्रकल्पात नरभक्षक

- गणेश वासनिक,  अमरावतीराज्यात नरभक्षक म्हणून नोंद असलेले वाघ, बिबटे व इतर वन्यपशु बंदिस्त असून त्यांचा कारावास संपविण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्रकल्पात नरभक्षक वन्यपशुंना पाठविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यामुळे काही वर्षांपासून कोठडीत कैद असलेल्या नरभक्षक वन्यपशुंचा कारावास संपून आता त्यांची बंदीगृहातून सुधारगृहाकडे वाटचाल सुरू झाली आहे.राज्यभरात वनविभागाच्या कोठडीत कैद असलेल्या नरभक्षक वाघ, बिबटे, चितळ, अस्वल आदी वन्यपशुंना सुरक्षितस्थळी हलविण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी घेतला आहे. त्यानुसार ११ मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून नरभक्षक वन्यपशुंना नागपूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोरेवाडा प्रकल्पात पुनर्वसनासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली भागात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्यांना रेस्क्यू आॅपरेशनद्वारे वनविभागाच्या कोठडीत कैद करण्यात आले होते, असे मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी सांगितले.अमरावतीमधील वडाळीच्या वनकोठडीत राजा व शेरा हे दोन नरभक्षक बिबटे आठ वर्षांपासून बंदिस्त आहेत. त्यांनाही गोरेवाडा प्रकल्पात पाठविले जाणार आहे. गोरेवाडा प्रकल्पात नरभक्षक वन्यपशुंचे नियोजन, नियंत्रणाची जबाबदारी वनविकास मंडळांकडे सोपविण्यात आली आहे. नरभक्षक वन्यपशुंना गोरेवाडा प्रकल्पात आणल्यानंतर त्यांच्या प्रजननवाढीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी वनविकास मंडळावर सोपविण्यात आली आहे.