शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

‘मॅट’च्या आदेशाने परीक्षार्थीना दिलासा

By admin | Updated: August 19, 2014 01:50 IST

गरज असेल तर परीक्षार्थीना दिलासा द्यावा, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट)ने दिला आहे.

मुंबई : राज्य वनसेवेतील साहाय्यक वनसंरक्षकांची 10 व वनक्षेत्रपालाची 272 पदे भरण्यासाठी गेल्या 27 एप्रिल रोजी घेतलेल्या पूर्वपरीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी आधी उपलब्ध असलेले मराठी माध्यम कोणतीही पूर्वसूचना न देता ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने नुकसान झाले अशी तक्रार, निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्याचा गुणवत्तेवर विचार करावा आणि गरज असेल तर परीक्षार्थीना दिलासा द्यावा, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट)ने दिला आहे.
बळीराम एन. महाजन वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणात अशाच स्वरूपाच्या वादात ‘मॅट’ने सर्वच परीक्षार्थीनी सरसरट गुण वाढवून देण्याचा निकाल 2क्क्1 मध्ये दिला होता, याचा दाखलाही न्यायाधिकरणाने हा आदेश देताना दिला. एकूण 29 हजार परीक्षार्थीनी ही पूर्वपरीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर आयोगास वरीलप्रमाणो काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर त्याचा लाभ एवढय़ा परीक्षार्थीना मिळू शकेल. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दानिश, कासिफ आणि रशिद युसूफ पठाण या सदर पूर्वपरीक्षेस बसलेल्या तीन सख्ख्या भावांनी केलेल्या याचिका निकाली काढताना ‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल व न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांनी हा आदेश दिला.
आयोगाने आधी जानेवारीत या स्पर्धा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली तेव्हा पूर्वपरीक्षा इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमांतून देता येईल, असे सांगण्यात आले होते. नंतर फेब्रुवारीत पुन्हा एक छोटेखानी जाहिरात दिली गेली त्यात परीक्षेच्या माध्यमाचा काहीच उल्लेख नव्हता. मात्र एप्रिलमध्ये प्रत्यक्ष परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमातून घेण्यात आली. मराठी माध्यम ऐनवेळी काढल्याने परीक्षा अपेक्षेप्रमाणो साफाईने देता आली नाही. इंग्रजीहून मराठीवर अधिक प्रभुत्व असल्याने व परीक्षेतील प्रत्येक ‘ऑबजेक्टिव’ प्रश्नासाठी जेमतेम 36 सेकंद उपलब्ध असल्याने माध्यम बदलाने आमचे नुकसान झाले, असे या भावांचे म्हणणो होते. त्यांच्यावतीने अॅड. अरविंद बांदिवडेकर व अॅड. सी.टी.चंद्रात्रे यांनी काम पाहिले. आयोगाचे उपसचिव प्रदीपकुमार भुर्के यांच्या प्रतिज्ञापत्रच्या आधारे आयोगाची बाजू मांडताना सरकारी वकील दिनेश खैरे यांनी असे सांगितले की, परीक्षा होण्यापूर्वी एकाही परीक्षार्थीने माध्यमाच्या संदर्भात तक्रार केली नाही. परीक्षा झाल्यावर अजर्दारांसह काही मोजक्या परीक्षार्थीनी तक्रार केली खरी, पण वस्तुत: ती केवळ पश्चातबुद्धी होती. शिवाय या पदांसाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ते सर्व अभ्यासक्रम फक्त इंग्रजीतच शिकविले जातात. त्यामुळे पूर्वपरीक्षा केवळ इंग्रजीत घेतल्याने नुकसान होण्याचे काही कारण नाही.(विशेष प्रतिनिधी)
 
नक्की अंदाज करणो कठीण
न्यायाधिकरणाने म्हटले की, परीक्षेचे आधी ठरलेले माध्यम ऐनवेळी रद्द करणो योग्य नाही. तरीही यामुळे परीक्षार्थीची खरंच अडचण झाली का व झाली असेल तर त्यांचे किती नुकसान झाले याचा नेमका अंदाज करणो अशक्य आहे. तरीही मराठी माध्यम रद्द केल्याने कोणाचेही काहीच नुकसान झाले नसेल, असेही म्हणता येत नाही. त्यामुळे आयोगाने कायदेशीर मुद्दय़ांचा खल न करता निकाल लागल्यावर परीक्षार्थीनी तक्रार केल्यास त्याचा विचार करावा व त्यांना कसा दिलासा देता येईल हे ठरवावे. तसेच भविष्यात पुन्हा अशा वादाला वावही मिळणार नाही याची काळजी घ्यावी.