शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ‘कमळ’ रद्द करा !

By admin | Updated: July 7, 2016 19:52 IST

कमळ राष्ट्रीय फूल असल्याने ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह असू शकत नाही. त्यामुळे भाजपाला पक्षचिन्ह म्हणून देण्यात आलेले ‘कमळ’ रद्द करण्यात यावे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ७ : कमळ राष्ट्रीय फूल असल्याने ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह असू शकत नाही. त्यामुळे भाजपाला पक्षचिन्ह म्हणून देण्यात आलेले ‘कमळ’ रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.भाजपा निवडणूक लढवण्यासाठी कमळाचा वापर करून ‘एम्ब्लेम्स अ‍ॅण्ड नेम्स (प्रिव्हेन्शन आॅफ इम्प्रॉपर युझ) अ‍ॅक्ट, १९५० चे उल्लंघन करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

‘भारतीय संस्कृतीत कमळ हे पवित्र व शुभ मानले जाते. कमळ हे लक्ष्मी देवीचे फूल मानले जाते,’ असे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे. ‘कमळ हे शुद्धतेचे, यश, उदंड आयुष्याचे प्रतीक आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकत नाही,’ असे याचिकेत म्हटले आहे. भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ रद्द करण्यात यावे, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे निवेदन केले. मात्र त्यांनी याची दखल न घेतल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पाटील यांनी म्हटले.

२५ वर्षांपूर्वी भाजपाला निवडणूक चिन्ह म्हणून कमळ वापरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यावर कोणत्याही पक्षाने किंवा व्यक्तीने आक्षेप घेतला नाही. निवडणूक आयोगाला यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश देऊन भाजपाचे पक्षचिन्ह रद्द करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.