शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत : राणे

By admin | Updated: October 24, 2015 00:43 IST

अच्छे दिन दाखवणाऱ्या भाजपाने सत्तेत आल्यावर लोकांना बुरे दिन आणले. जिल्हा नियोजनच्या निधीला ४० टक्केची कात्री लावून हा निधी विदर्भाला नेण्याचे काम भाजपाने केले.

दोडामार्ग : पैशाने जर निवडणुका जिंकता आल्या असत्या, तर नीलेश राणे कधीच पडला नसता. त्यामुळे अमुक पैसे आले, तमुक पैसे आले अशा अफवा पसरवित असतील, तर त्या अफवांना बळी पडू नका. कारण कोणत्याच निवडणुका पैशाने जिंकता येत नाहीत. निवडणुका जिंकायच्या असतील, तर घरोघरी संपर्क ठेवा आणि जनतेचा सेवक म्हणून काम करा, असे आवाहन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.येथील दळवी कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, चंदू मळीक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमानंद गवस आदी उपस्थित होते. यावेळी नीलेश राणेंनी सेना-भाजपा युतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात कोकणात सहज निधी येत होता. मात्र, आता अच्छे दिन दाखवणाऱ्या भाजपाने सत्तेत आल्यावर लोकांना बुरे दिन आणले. जिल्हा नियोजनच्या निधीला ४० टक्केची कात्री लावून हा निधी विदर्भाला नेण्याचे काम भाजपाने केले. कोकणात येणारा निधी बंद झाला. त्यामुळे इथली विकासकामे ठप्प झाली. इथल्या सेनेच्या पालकमंत्र्यांना तर खुळ लागलंय. ते समजतात पालकमंत्र्याची खुर्ची देवाने दिली. ही खुर्ची जरी देवाने दिली असली, तरी ती लोकांच्या सेवेसाठी आहे हे ते विसरले आहेत. या खुर्चीचा वापर ते मिरवण्यासाठी करीत आहेत. त्यामुळेच आज सेना-भाजपच्या विरोधात संपूर्ण वातावरण आहे. दोडामार्ग ते मंडणगड सगळीकडेच काँग्रेस-राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. मात्र, कोणीही गाफील राहता कामा नये. प्रत्येकाने घरोघरी संपर्क ठेवा आणि जनतेचे सेवक म्हणून काम करा, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी)