शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार जलसेवक राबवणार मोहीम

By admin | Updated: July 13, 2016 03:56 IST

वन दिनानिमित्त वृक्षारोपणाच्या यशस्वी मोहिमेनंतर आता राज्यभर जलसाक्षरतेसाठी खास अभियान चालविण्यात येणार आहे.

मुंबई : वन दिनानिमित्त वृक्षारोपणाच्या यशस्वी मोहिमेनंतर आता राज्यभर जलसाक्षरतेसाठी खास अभियान चालविण्यात येणार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २८ हजार जलसेवकांची टीम पाण्याविषयी जनजागृती करणार असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याशिवाय राज्यात विभागीय जलसाक्षरता केंद्रदेखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यात जलसाक्षरता मोहीम आणि जलसाक्षरता केंद्रांच्या उभारणीबाबत चर्चा झाली. अलीकडच्या काळात पाण्याची भीषण टंचाई राज्याने अनुभवली आहे. विशेषत: मराठवाड्यासारख्या भागात पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या होती. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने पाण्याचा वापर, काटकसर होणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती आणि प्रबोधन आवश्यक आहे. त्यासाठी जलसाक्षरता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी राज्यभरातून एकूण ४ हजार ६२४ जलनायक नेमण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर २४, विभागीय स्तरावर ४८, जिल्हास्तरावर ३४० आणि तालुकास्तरावर ४२१२ जलनायक असतील, तर ग्रामसभेच्या माध्यमातून २८ हजार जलसेवक या मोहिमेची धुरा सांभाळतील, असे मुनगंटीवार म्हणाले. सर्व जलसेवक विनामोबदला या मोहिमेत सहभागी होणार आहेत. शेकडो जणांनी जलसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)