शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

By admin | Updated: September 25, 2016 02:11 IST

मराठेतर आरक्षणामुळे समाजात मोठी दुही निर्माण झाली असून, त्यामुळे सामाजिक समता राहिलेली नाही. या विषमतेचा फटका मराठा समाजातील तरुण पिढीला बसला आहे.

उदयनराजे भोसले : आर्थिक निकष मान्य करा

नाशिक : मराठेतर आरक्षणामुळे समाजात मोठी दुही निर्माण झाली असून, त्यामुळे सामाजिक समता राहिलेली नाही. या विषमतेचा फटका मराठा समाजातील तरुण पिढीला बसला आहे. मराठा समाजातील तरुण आता जागा झाला असून, त्यांच्यामध्ये ही धग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मोर्चाचा विचार करून सरकारने मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी येथे केली. नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चासाठी उपस्थित असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारची धोरणे आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांवर तोफ डागली. भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत ‘समानता’ हा एक मुद्दा आहे, परंतु ही समानता खरेच आहे का? आरक्षणाला आमचा विरोध नाही, समाजातील उपेक्षित घटकाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर मिळायला हवे, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.कालची जी परिस्थिती होती ती आज नाही, त्यामुळे आरक्षण रचनेचा पुनर्विचार करायला हवा. मराठा समाजाचा विचार कोणताही पक्ष करीत नाही, त्याप्रमाणेच मराठा समाजातील प्रस्थापितांनी विस्थापित मराठा तयार केले, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)...तर घटनेत बदल कराअ‍ॅट्रॉसिटी कायद्यामुळे मराठा तरुणांवर अन्याय होत आहे. अनेकांवर खोट्या केसेस असून त्यात बदल झाला पाहिजे. ज्या काळात हा कायदा झाला त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. काळानुरूप समाज बदलत असल्याने काद्यातही बदल होणे अपेक्षित आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ शकत नसतील तर घटनेतील तरतुदीत बदल करा, असेही ते म्हणाले. आरोपीस गोळ्या घालाकोपर्डी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी भर चौकात जनतेसमोर फाशी दिली पाहिजे किंवा त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे सांगून सरकारला हे जमणार नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या, बघा आम्ही काय करतो, असेही उदयनराजे म्हणाले.