शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवासीभिमुख होण्यासाठी कॉल सेंटर आवश्यक :दिवाकर रावते

By admin | Updated: July 9, 2017 15:24 IST

एसटीच्या प्रवाशांना दूरध्वनीद्वारे एसटीबद्दलचे वेळापत्रक, आरक्षण, जादा बसेस, विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - एसटीच्या प्रवाशांना दूरध्वनीद्वारे एसटीबद्दलचे वेळापत्रक, आरक्षण, जादा बसेस, विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने बाह्य संस्थेद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित "माहिती केंद्रे"(कॉल सेंटर ) सुरु करण्यात येत आहे. या प्रसंगी "प्रवाशांच्या तक्रारी व सूचनांचे तातडीने निरसन व्हावे व एसटी सेवा अधिकाधिक प्रवासीभिमुख व्हावी यासाठी असे माहिती केंद्रे विकसित होणे अत्यंत आवश्यक  आहे"  असे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी केले .
सन २०१० मध्ये एसटीमार्फत १८००२२१२५० या निःशुल्क दूरध्वनी क्रमांकाद्वारे एक माहिती केंद्र सुरु केले आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे सदर माहिती केंद्र  (कॉल सेंटर ) प्राथमिक अवस्थेत व त्रोटक स्वरूपात सुरु आहे.  एसटीतून दररोज सरासरी ६६ लाख प्रवाशी प्रवास करतात. त्यांना एसटीच्या विविध योजनांची माहिती, बसेसचे वेळापत्रक, आरक्षण अशा विविध स्वरूपाची माहिती तसेच एसटी सेवेबद्द्लच्या त्यांच्या सूचना व तक्रारी करण्यासाठी  २४ तास अविरतपणे चालणारे "माहिती केंद्र" (कॉल सेंटर) निर्माण होणे, ही काळाची गरज होती. साय फ्युचर इंडिया प्रा. लि. या कंपनीशी एसटी महामंडळाने करार करून सदर "माहिती केंद्र" (कॉल सेंटर ) सुरु करण्याची योजना आखली असून येत्या दोन महिन्यात आधुनिक स्वरूपात व प्रशिक्षित मनुष्यबळासह अविरत कार्यरत असणारे एसटीचे माहिती केंद्र (कॉल सेंटर ) सुरु होत आहे.