शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

केबल टीव्ही झाले बंद !

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

सेट टॉप बॉक्स नसणाऱ्या ९ लाख टीव्हींवर आजपासून मुंग्या दिसू लागतील. राज्यातील केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनच्या तिसऱ्या टप्प्याची कारवाई पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची

मुंबई : सेट टॉप बॉक्स नसणाऱ्या ९ लाख टीव्हींवर आजपासून मुंग्या दिसू लागतील. राज्यातील केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनच्या तिसऱ्या टप्प्याची कारवाई पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ केंद्र शासनाने नाकारल्यामुळे हा निर्णय महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्यात शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या केबल सेनेचे वर्चस्व असणाऱ्या केबल व्यवसायावर या निर्णयाने टाच येणार असून, एक प्रकारे भाजपाने नववर्षात केबल सेनेलाही मुंग्या आणण्याचे काम केले आहे.खडसे म्हणाले, केबल टीव्हीच्या ‘डिजिटायझेशन फेज थ्री’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची कार्यवाही ३० सप्टेंबर २०१४पर्यंत पूर्ण करायची होती. मात्र त्या वेळेत हे काम पूर्ण झाले नाही म्हणून केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने ही मुदत ३१ डिसेंबर २०१५पर्यंत वाढवली होती.महसुली उत्पन्न वाढेलया मोहिमेचा आढावा घेतला असता बऱ्याच केबल टीव्हीधारकांनी सेट टॉप बॉक्स बसवले नसल्याचे उघडकीस आले. अशांची संख्या जवळपास ९ लाखांच्या घरात आहे. राज्याच्या महसुली उत्पन्नापैकी करमणूक शुल्क हे महत्त्वाचे उत्पन्न असल्याने केबल फेज थ्रीची अंमलबजावणी पूर्ण न होण्याचा विपरीत परिणाम राज्याच्या महसुलावरही होत असल्याचे खडसे म्हणाले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करमणूक कर बुडविल्याची उदाहरणेही समोर आली. ही सगळी माहिती दिल्लीत झालेल्या बैठकीत ठेवण्यात आली. अन्य राज्यांनीही फेज थ्रीच्या कामाला ३१ मार्च २०१६पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती; मात्र केंद्राने ती मागणी अमान्य केली. परिणामी राज्यातच नाही, तर देशभरात सगळीकडेच आता ज्यांनी सेट टॉप बॉक्स बसवलेले नाहीत त्यांचे सिग्नल आजपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.राज्यात करमणूक करापोटी ७५० कोटींचे उत्पन्न मिळते. सेट टॉप बॉक्स लावल्यास हे उत्पन्न आणखी वाढेल. - मनुकुमार श्रीवास्तवही, प्रधान सचिव, महसूल विभाग