शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दररोज १.२0 लाख क्विंटल कापूस खरेदी!

By admin | Updated: February 18, 2017 03:20 IST

आजमितीस दर स्थिर पण, वाढण्याची शक्यता.

अकोला, दि. १७- राज्यातील कापूस खासगी बाजारात दररोज १ लाख २0 हजार क्विंटल कापसाची खरेदी होत असून, आतापर्यंत १ कोटी ३४ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. दरही स्थिर असून, भविष्यात वाढण्याची शक्यता कापूस तज्ज्ञांनी वर्तविली आहे.कापूस वेचणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आजमितीस राज्यातील कापूस बाजारात कापसाची आवक दररोज १ लाख २0 हजार क्विंटल आहे, तर देशात दररोज जवळपास १0 लाख क्विंटलची आवक आहे. दरम्यान, आतापर्यंत कापसाचे दर हे ५७00 ते ५९00 रुपये प्रतिक्विंटल आहेत. अकोला जिल्हय़ातील अकोट येथील कापूस बाजारात कापसाचे प्रतिक्विंटल दर हे सहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. मागील दहा वर्षांत यावर्षी वाढलेले कापसाचे दर हे सर्वाधिक आहेत. आता तर मागील पंधरा दिवसांपासून दर स्थिर असल्याने भविष्यात दर वाढण्याची शक्यता कापूस उद्योजकांनीच वर्तविली आहे.सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर स्थिर आहेत. परिणामी देशातही कापसाचे दर स्थिर आहेत. त्याचमुळे शेतकर्‍यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. मार्च महिन्यात मात्र ही विक्री वाढण्याची शक्यता कापूस व्यापार्‍यांनी वर्तविली आहे. उन्हाळ्य़ात कापसातील ओलावा कमी होतो आणि वजन घटत असल्याने शेतकरी कापूस विकतोच असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. म्हणूनच शेतकर्‍यांनी टप्प्या टप्प्याने कापूस विकावा, शेतकर्‍यांकडे २0 क्विंटल कापूस असेल, तर त्यांनी त्यातील पाच क्विंटल कापूस विकून सध्या असलेल्या दराचा फायदा घ्यावा, असे कापूस तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पणन महासंघाची शून्य खरेदीयावर्षी पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र उघडली आहेत, पण आतापर्यंत या केंद्रावर शेतकर्‍यांनी कापूस विकला नाही.- राज्यात आतापर्यंत १३४ लाख क्विंटल कापूस व्यापार्‍यांनी खरेदी केला आहे. सध्या कापसाचे दरही स्थिर आहेत. भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.- सध्या कापसाचे दर ५८00 रुपये क्विंटलपर्यंत आहेत. शेतकर्‍यांनी टप्प्या-टप्प्याने विकून या दराचा फायदा घ्यावा. कारण कापसाच्या दराचे काही सांगता येत नाही.- डॉ.एन.पी. हिराणी,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महांसघ,मुंबई.