शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरला घरफोडी; दागिने लंपास

By admin | Updated: October 8, 2016 00:53 IST

अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील ४० हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना गुरुवारी (दि. ६) उघडकीस आली.

लातूर : अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास (एमएसडीपी) योजनेअंतर्गत लातूर शहर मनपाला मौलाना आझाद शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी ४ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र संकुलाला जागा मिळत नसल्याने हा निधी परत जाण्याची भीती आहे. दरम्यान, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दोन दिवसांत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सर्वसाधारण सभेत दिले होते. पण नऊ दिवस उलटले तरी अद्याप जागा मिळाली नाही.
अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत लातूर महानगरपालिकेमार्फत तीनवेळा प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र त्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे शासनाकडून फेरप्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार लातूर मनपाने फेरप्रस्ताव पाठविला असता तो मंजूर झाला आहे. या प्रस्तावानुसार मौलाना आझाद शैक्षणिक संकुलाची इमारत मंजूर झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी ४ कोटी ४० लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. या इमारतीत अल्पसंख्याक मुलांसाठी वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, आरोग्य केंद्र बांधणे, स्वच्छतागृह करण्यात येणार आहे. परंतु, लातूर शहर हद्दीत अद्याप मनपाला जागा मिळाली नाही.
अंबाजोगाई रोडवरील बुस्टर पंपची जागा आहे. परंतु, ही जागा सोयीची आणि अपुरी पडत असल्याने या जागेचा ठराव सर्वसाधारण सभेत होऊ शकला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मणियार यांनी अल्पसंख्यांक योजनेला मुद्दाम जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप केला असून, त्यांनी शुक्रवारी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींना ४८ तासांच्या आश्वासनाचे काय झाले, असे पत्र पाठविले असून, जागा कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
कोंडवाड्याची जागा सोयीची...
टाऊन हॉलच्या परिसरालगत लातूर मनपाच्या कोंडवाड्याची जागा आहे. शिवाय, पटेल चौक येथेही लातूर मनपाच्या दवाखान्याची जागा आहे. या दोन्हीपैकी एका जागेत संकुल उभे करावे, अशी मागणी नगरसेवक राजा मणियार यांनी केली आहे. परंतु, ही जागाही अपुरी पडत असल्याने अन्य जागेचा शोध घेतला जात असल्याचे महापौर ॲड. दीपक सूळ यांनी सांगितले.