शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे उद्यापासून राज्यभर ‘पर्दाफाश आंदोलन’: अशोक चव्हाण

By admin | Updated: August 20, 2015 23:12 IST

या आंदोलनातून भाजपचा दुटप्पीपणा उघड करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

कोल्हापूर : भाजपच्या केंद्रातील व राज्यातील सरकारचा पर्दाफाश करणारे आंदोलन काँग्रेसतर्फे येत्या शनिवार (दि. २२) पासून राज्यभर सुरू करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे केली. या आंदोलनातून भाजपचा दुटप्पीपणा उघड करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यभर दुष्काळाचे गडद सावट असताना त्याबद्दल कोणत्याच उपाययोजना न करता हाताची घडी घालून बसलेल्या सरकारवर त्यांनी टीकेची तोफ डागली.येथे राजीव गांधी सद्भावना दौडच्यानिमित्ताने आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी ते आले होते. सायंकाळी त्यांनी शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, सुरेश कुराडे, प्रल्हाद चव्हाण, सत्यजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.चव्हाण म्हणाले,‘हे आंदोलन २२ ते २५ आॅगस्टदरम्यान आम्ही करू. त्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन, मेळावे, सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रसारमाध्यमांशी संवाद या माध्यमातून भाजपच्या धोरणांचा पर्दाफाश करू. संसदेचे अधिवेशन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चालवू दिले नाही म्हणून भाजपने प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात आंदोलन सुरू केले आहे. त्यास प्रत्युत्तर देण्याचे काम काँग्रेसतर्फे केले जाईल. ....म्हणे महाडिक-सतेज हा वैचारिक मतभेदकोल्हापूर जिल्हा काँग्रेसमधील बेदिलीबद्दल पत्रकारांनी चव्हाण यांना विचारणा केली. ते म्हणाले,‘आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यात वाद नसून ते वैचारिक मतभेद आहेत. या दोघांशी बोलून तो सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करू.’महाडिक यांची पाठराखणकाँग्रेसचे आमदार महाडिक यांचा मुलगा हा पक्षाच्या विरोधातील ताराराणी आघाडीचा निमंत्रक असल्याचे निदर्शनास आणून दिले असता प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्यात काय गैर नसल्याचेच अप्रत्यक्षरीत्या सांगून टाकले, असे एकाच कुटुंबातील विविध पक्षांत काम करणारे नेत्यांची राज्यात अनेक उदाहरणे आहेत. शिवाय आमदार महाडिक माझ्या स्वागताला आले होते. त्यांनीच मला माझा ताराराणी आघाडीशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे नगरसेवक या आघाडीकडे गेले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर तिथे बसलेले सतेज पाटील यांनी खुलासा केला. जे मूळचे ताराराणी आघाडीचे होते तेच परत त्या आघाडीकडे गेले आहेत. काँग्रेसचे कोणीही नगरसेवक या आघाडीकडे गेले नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.