शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसी जाचातून व्यापाऱ्याची आत्महत्या!

By admin | Updated: July 10, 2015 02:33 IST

पोलिसी जाचातून तरुण व्यापाऱ्याने गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक करीत पोलिसांची दोन वाहनेही

सोनपेठ (जि़परभणी) : पोलिसी जाचातून तरुण व्यापाऱ्याने गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक करीत पोलिसांची दोन वाहनेही पेटवून दिली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करीत चार फैरी झाडल्या. त्यानंतरही संतप्त जमावाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीवरही दगडफेक केल्याने गुरुवारी दिवसभर सोनपेठ शहरात तणावाचे वातावरण होते़ दरम्यान, पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोनपेठ येथे भेट दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली़मुरलीधर हाके यांचे सोनपेठमध्ये किराणा दुकान आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री या दुकानावर छापा टाकून गुटखा ताब्यात घेतला होता. हाके यांचा मुलगा विठ्ठल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवून गुरुवारी सकाळी त्याला सोडून दिले. घरी आल्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास विठ्ठलने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येबाबत कळताच संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. पोलिस ठाण्यासमोर जमाव जमला. नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक तिडके, जमादार सुरेश पाटील, शिपाई लटपटे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी जमावाने केली. त्यातूनच दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करीत चार फेैरी झाडल्या. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे सोनपेठकडे येत असताना त्यांच्या गाडीवरही दगडफेक झाली. यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. यावरही हा जमाव थांबला नाही. ठाण्याच्या परिसरातीलच पोलिस कर्मचाऱ्याची मोटारसायकल व सहाय्यक पोलीस निरीक्षकाची खाजगी कार पेटवून दिली. ही दोन्ही वाहने भस्मसात झाली. निरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाच्या काचाही फोडण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नियती ठाकर शहरात दाखल झाल्या. ही माहिती मिळताच पुन्हा एकदा दगडफेक झाली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबियांच्या जबाबाची नोंद घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. (वार्ताहर)