शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

बसखाली गेली दुचाकी...चालकाने मारली उडी !

By admin | Updated: August 8, 2016 17:38 IST

सोमवारची भरदुपारी १२ ची वेळ... बीड आगाराची एमएच-२० बीएल-१६३४ ही शेगाव-बीड बस आगारात प्रवेश करीत होती... त्या दरम्यानच मागून येणा-या भरधाव दुचाकीस्वाराचा ताबा सुटला.

- राजेश खराडे
 
बीड, दि.08 -  सोमवारची भरदुपारी १२ ची वेळ... बीड आगाराची एमएच-२० बीएल-१६३४ ही शेगाव-बीड बस आगारात प्रवेश करीत होती... त्या दरम्यानच मागून येणा-या भरधाव दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. सर्व जण श्वास रोखून पुढे काय होते ते पाहू लागले. तेवढ्यात त्याने प्रसंगावधान राखून दुचाकीवरून उडी मारत थेट मृत्यूलाच हुलकावणी दिली. त्यामुळे बसखाली त्याची दुचाकी गेली परंतु तो दुचाकीस्वार मात्र सहीसलामत बचावला. किरकोळ खरचटण्यापलिकडे फारशी दुखापत त्याला झाली नाही.
 
प्रत्यक्षदर्र्शींच्या अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना..  औरंगाबाद महामार्ग शहरातून जातो. या महामार्गावरच बीडचे बसस्थानक आहे.  नेहमीप्रमाणेच आजही वाहनांची आणि पादचाºयांची बसस्थानकासमोर वर्दळ वाढली होती. वाहतूक नियंत्रकही वाहतूक नियंत्रण ठेवण्यात व्यस्त होता. मात्र अचानकपणे गुजरात पासिंगची करिझ्मा ही दुचाकी बसखाली गेल्याने खळबळ उडाली. दुचाकीस्वाराने गाडीवरून केव्हा उडी मारली हे न समजल्याने बघ्यांची नजर त्याला बसच्या चाकाखाली शोधत होती. मात्र, तो किरकोळ जखमी झाल्याने  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसखाली आल्याने दुचाकीचे नुकसान झाले परंतु चालक बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश:वास सोडला. सुदैव इतकेच की त्याने उडी मारली त्यावेळी दुसरे वाहन तेथून जात नव्हते.