शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी ३ नगरसेवकाचा जामिन मंजूर

By admin | Updated: February 23, 2016 19:48 IST

बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी ३ नगरसेवकाचा जामिन ठाणे न्यायालयाने आज मंजूर केला आहे. सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण या तिन्ही नगरसेवकांचा जामिन मंजूर करण्यात आला आहे

 ऑनलाइन लोकमत

 ठाणे, दि. २३ - बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी ३ नगरसेवकाचा जामिन ठाणे न्यायालयाने आज मंजूर केला आहे. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांना १५ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.
 
सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण या तिन्ही नगरसेवकांचा जामिन मंजूर करण्यात आला आहे.  प्रत्येकी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे तब्बल ७८ दिवसांनंतर त्यांची बुधवारी ठाणे कारागृहातून मुक्तता होणार आहे. 
 
परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ४ नगरसेवकांना अटक केली होती.
 
सुरज परमार अत्महत्येचा घटनाक्रम - 
बिल्डर सूरज परमार यांनी ७ आॅक्टोंबर २०१५ रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर सूसाईड नोटच्या अहवालाच्या आधारे चारही नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.चौघेही नगरसेवक ५ डिसेंबर रोजी पोलिसांना शरण आले. ५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २०१६ या ७० दिवसांमध्ये ९ दिवस पोलीस तर उर्वरित ६१ दिवस ते न्यायालयीन कोठडीत आहेत.१५ फेब्रुवारी रोजी नजीब मुल्ला यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला.