शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात नवीन कारागृह बांधा

By admin | Updated: December 31, 2016 03:07 IST

राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी व आरोपी कोंबण्यात आल्याने त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नवीन कारागृह बांधण्याचा

मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी व आरोपी कोंबण्यात आल्याने त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नवीन कारागृह बांधण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये स्वयंपाकगृह आणि अन्य सुविधांसाठीही जागा उपलब्ध करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.राज्यातील कारागृहांमध्ये आरोपी व कैदी यांना कोंबण्यात आले आहेत. त्यामुळे शौचालय, बाथरूम, किचन यांसारख्या अन्य सुविधांवर याचा परिणाम होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांनी राज्य सरकारला नवे कारागृह बांधण्याचा आदेश दिला. त्याचा आराखडा जानेवारी २०१७पर्यंत सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले. अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असलेले हे एक नवीन आदर्श कारागृह असावे, अशी आशा खंडपीठाने व्यक्त केली.आर्थर रोडमध्ये नेहमीच क्षमतेपेक्षा अधिक आरोपी व कैदी ठेवण्यात यायचे. परंतु, त्याला पर्याय म्हणून सरकारने तळोजा येथे नवे कारागृह बांधले. त्यामुळे आर्थर रोड येथील आरोपी व कैद्यांची गर्दी कमी झाली, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या शेख इब्राहिम अब्दुलने कारागृहाच्या स्थितीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.कारागृहाची स्थिती अत्यंत वाईट असून, ती हाताळण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी केली. (प्रतिनिधी)अपुऱ्या जागेत कैदीयापूर्वीच्या सुनावणीत राज्य सरकारने येरवडा कारागृहात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा चांगला असून, केवळ जागेची कमतरता असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. येरवडा कारागृहाची क्षमता २,३२३ इतकी असून, सध्या या कारागृहात सुमारे ६ हजार कैदी ठेवण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले होते.