शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

भाऊचा धक्का-मोराला ‘स्पीड’

By admin | Updated: January 5, 2015 05:00 IST

प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा असणा-या या स्पीड बोटी ४० मिनिटांत प्रवाशांना मुंबईत पोहोचविणार आहेत. त्यामुळे रखडत चालणाऱ्या जुनाट वेळखाऊ बोटींच्या सेवेतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

मधुकर ठाकूर, उरणभाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावरील प्रवासाचा वेळ आता २० मिनिटांनी घटणार आहे. खासगी कंपनीच्या वेगवान बोटींना प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिल्याने येत्या फेब्रुवारीपासून या जलमार्गावर फायबरच्या स्पीड बोटी धावणार आहेत. प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा असणा-या या स्पीड बोटी ४० मिनिटांत प्रवाशांना मुंबईत पोहोचविणार आहेत. त्यामुळे रखडत चालणाऱ्या जुनाट वेळखाऊ बोटींच्या सेवेतून प्रवाशांची सुटका होणार आहे. भाऊचा धक्का-मोरा या सागरी मार्गावरून दररोज हजारो प्रवासी आणि कामगार प्रवास करतात. या सागरी मार्गावर ५० वर्षांपासून चालत असलेल्या जुनाट प्रवासी बोटी ९ कि.मी. सागरी अंतर कापण्यासाठी तासाभराचा अवधी घेतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांना अनियमित सेवेचा सामना करावा लागतोच, शिवाय कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. मोरा सागरी मार्गावरून पावसाच्या आणि मालक -कर्मचाऱ्यांच्या लहरीनुसारच प्रवासी बोटी सोडल्या जातात. पावसाळी हंगामात मोरा जलमार्गावरील तिकीट दरात १० ते १५ रुपयांपर्यंत वाढ केली जाते. ही तिकीट दरवाढ कित्येक वेळा इंधन महागल्याचे कारण पुढे करीत नंतर कायम केली जाते. त्यामुळे कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नसतानाही प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.या समस्यांमुळे मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांनी सागरी मार्गाचा नाद सोडून बेलापूर-जुईनगर गाठून रेल्वेप्रवासाला पसंती दिली आहे. त्यामुळे रेवस, मोरा या सागरी मार्गावरील प्रवाशांची संख्या घटली आहे. या सागरी मार्गावर मागील ५० वर्षांपासून खासगी लाँच मालकांचीच मक्तेदारी आहे. लाँचमालकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मोरा सागरी मार्गावर स्पीड बोटी चालविण्यासाठी ‘आर.एम. शिपिंग कंपनी’ने परवानगी मागितली होती. प्रशासनानेही प्रवाशांचे हित जपण्यासाठी भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावर स्पीड बोटींना सहा महिन्यांपूर्वीच बंदर विभागाकडून परवानगी दिली आहे.