शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: August 17, 2016 20:02 IST

तीन बहिणीत एकुलता एक असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी माहेरी येणार होत्या. मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला.

ऑनलाइन लोकमतउमरखेड, दि. 17 - तीन बहिणीत एकुलता एक असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी माहेरी येणार होत्या. मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला. या तिघींचा लाडका भाऊराया अपघातात काळाने हिरावून नेला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने तालुक्यातील देवसरी येथे शोककळा पसरली. पुंजाराम रामराव देवसरकर (४०) रा. देवसरी असे मृताचे नाव आहे. आई-वडिलांना एकुलता एक असलेला पुंजाराम रक्षाबंधनाला बहिणी घरी येणार असल्याने उत्साहात होता. बुधवारी तो काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने उमरखेडला जात होता. त्यावेळी साखरा गावाजवळील पुलावर त्याची दुचाकी स्लीप झाली. तो खाली कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाला. ही वार्ता देवसरी येथे पसरताच सर्वांना धक्का बसला. पुंजारामला राखी बांधण्यासाठी त्याच्या पद्मावती, रेणुका आणि वनिता या तीन बहिणी गुरुवारी येणार होत्या. परंतु भावाला राखी बांधण्याऐवजी त्याच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. बुधवारी भावाचे कलेवर पाहून या तीन बहिणींचा आक्रोश गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत होता. या अपघाताची दखल पोलिसांनी घेतली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे