शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
12
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
13
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
14
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
15
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
16
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
17
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
18
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
19
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
20
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 

ब्रिटिशकालीन ‘जागले’ आताचे कोळी

By admin | Updated: October 31, 2016 05:05 IST

जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत.

विलास बारी,

जळगाव- जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत. कोळी पाणभरे व महादेव कोळींचे वास्तव्याच्या नोंदीसाठी राज्याचे माजी शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी शेकडो दस्तऐवज संकलित केले आहेत. ब्रिटिशकालीन जागले हेच खान्देशातील कोळी असल्याचा दावा त्यांनी या पुराव्यांच्या आधारे केला आहे. ब्रिटिशकाळात जागले कोण?ब्रिटिश राजवटीत १८७४ च्या कायद्यात कलम ६४(१) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हिंदू भिल्ल, कोळी आणि महार यांना १९१७ मध्ये जागले म्हणून विधिवत नेमणुका दिेल्या होत्या. या नेमणुका जाती व धर्मावर आधारित सरकारोपयोगी कनिष्ट नोकरांना दिलेल्या होत्या. या नेमणुका तीन ते चार गावांसाठी असायच्या.काय होते कामाचे स्वरूप?जागले म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांच्याकडे रात्रीचा पहारा करणे, गावात नवीन व्यक्ती कोण आली आहे त्याचा शोध घेणे, अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवणे, पावलांवरून चोरांचा माग काढणे, गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांना मदत करणे, तालुक्याच्या ठिकाणी वसुलीचे पैसे घेऊन जाणे, जमिनीच्या व हद्द निशाणांच्या वेळी गावकामगारांबरोबर जाणे, तसेच वेळप्रसंगी तराळांची कामे करण्याची जबाबदारी होती.कोळी, पाणकेंचा पाटील व कुलकर्णी वतनदारांकडे वावरब्रिटिशकाळात कोळी जागले हे अस्पृश्य गणले जात होते. त्यांचे पद वंशपरंपरागत असल्याने त्यांच्या पदाबाबत रोटेशन पद्धत सुरू झाली. तळबंदी, कोळी पाणके, कोळी मल्हार यांची कामेदेखील निश्चित केली होती. गावस्तरावर पाणके हे पाटील व कुलकर्णी यांच्याकडे कामे करीत होते. त्याचा मोबदला म्हणून त्यांना कनिष्ठ वतनदारांच्या निम्मे जमीन दिलेली होती.१८७९ या वर्षाच्या शैक्षणिक माहितीचे संकलनडॉ. श्रीधर साळुंखे यांनी यासाठी खान्देश गॅझेटियरचा अभ्यास करून ३१ मार्च १८७९ या वर्षाच्या शैक्षणिक अहवालाची माहिती काढली. जनगणनेच्या अहवालाच्या परीक्षणानुसार कोळी जमातीतील लोक हे प्रामुख्याने विविध उपजमातीत विभागलेले होते. त्यामुळे एक उपजमात दुसऱ्या उपजमातीपेक्षा श्रेष्ठ समजत होते. १९२१ मध्ये खान्देश व गुजरातसाठी साहायक जिल्हाधिकारी डब्ल्यू ए.अलकॉक यांनी जनगणना करण्यापूर्वी कोळी उपजमाती लक्षात येत नसल्याने, त्यांची नोंद कोळी (गुजरात) व कोळी (खान्देश) अशी करण्याची सूचना केली होती, हे डॉ. साळुंखे यांनी साधार पटवून दिले आहे.> संशोधनासाठी या दस्तऐवजांचा केला अभ्यास...डॉ. श्रीधर साळुंखे यांनी खान्देशातील कोळी बांधवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तब्बल १६८ पानाचे दस्तऐवज तपासले आहेत. त्यात १८८० चे गॅझेटियर, २९ मे १९३३, २३ एप्रिल १९४२, १ नोव्हेंबर १९५०, २९ आॅक्टोबर १९५६, १ नोव्हेंबर १९६१ व १९७६ चा शासन निर्णय, १८७४ चा वंशपरंपरागत पद अधिनियम ३, जनगणना अहवाल १९०१, १९११, १९२१ व १९३१, जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या जमीन आदेशाच्या प्रती, जागल्यांच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत या दस्तऐवजांचा अभ्यास केला आहे. डॉ. साळुंखे यांच्या संशोधनानंतर आदिवासी टोकरे कोळी समाज परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर दस्तऐवजांसह निवेदन देत, जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलछा, कोलघा व कोळी मल्हार यांना मिळालेल्या घटनादत्त अधिकारांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी विनंती केली आहे.संशोधनासाठी यांचे मिळाले सहकार्यया संशोधनासाठी डॉ. श्रीधर साळुंखे यांना निवृत्त पोलीस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. भोकरीकर, अजय कोळी यांचे सहकार्य लाभले.