शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ठोस पुरावे आणा, केवळ चाचपणी कशाला?

By admin | Updated: December 8, 2014 02:46 IST

आमचा देश फसवणुकीच्या सर्व प्रकरणांमध्ये पूर्ण सहकार्य देईल. फसवणूक प्रकरणात किमान पुरावे तरी सादर केले जावे.

मुंबई : विदेशातील काळा पैसा परत आणण्याबाबत भारताने सातत्याने पाठपुरावा चालविल्याच्या पार्श्वभूमीवर स्वीत्झर्लंडने कोणत्याही चाचपणी मोहिमेत सहभागी होणार नसल्याचे तसेच भारताचे अधिकारी कोणताही स्वतंत्र तपास न करता स्वीस बँकेतील सर्व भारतीय खातेदारांच्या नावांची माहिती मागू शकत नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.आमचा देश फसवणुकीच्या सर्व प्रकरणांमध्ये पूर्ण सहकार्य देईल. फसवणूक प्रकरणात किमान पुरावे तरी सादर केले जावे. भूतकाळात जे घडले ते मिटवता येणार नाही, असे भारतातील स्वीत्झर्लंडचे राजदूत लाइनस वॉन कॅसलमूर यांनी स्पष्ट केले. यापूर्वी स्वीस बँकेत जमा असलेले सर्व पैसे कराच्या दृष्टीने वैध नसतील, याच्याशी सहमती दर्शविताच ते म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून या बँकेत विभिन्न स्रोताच्या माध्यमातून पैशाचा ओघ येत राहिला. खातेधारकांच्या चोरलेल्या यादीच्या आधारावर स्वीस अधिकाऱ्यांचे सहकार्य मागता येणार नाही. भारतीय तपाससंस्थांनी किमान फसवणुकीच्या प्रकरणांचा स्वतंत्र तपास करावा. आम्ही भारताची चिंता समजू शकतो. या मुद्यावर नि:संदिग्धपणे समजूतदारी दाखवायला हवी.