शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईटी’त पुण्याचे चमकदार यश

By admin | Updated: June 2, 2016 00:50 IST

राज्य शासनातर्फे मेडिकल, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी १८९ ते १९९ पर्यंत गुण मिळवले आहेत.

पुणे : राज्य शासनातर्फे मेडिकल, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी १८९ ते १९९ पर्यंत गुण मिळवले आहेत. परंतु, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यातील विद्यार्थ्यांचा सीईटीचा टक्का कमी असल्याचे दिसून येत आहे.राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी २०० गुणांची सीईटी परीक्षा घेण्यात आली. राज्यातील काही विद्यार्थ्यांनी २०० पैकी २०० गुण घेतले आहेत. पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमधील सृष्टी पाटील हिने १९९ गुण मिळविले आहेत, तर फर्ग्युसन महाविद्यालयातील आयुष ढोका याने १९३ गुण मिळविले आहेत. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी प्रवेशासाठी दिलेल्या सीईटी परीक्षेत पुण्याच्या श्रेया मेहता हिने १८९, अंकुर बोरसोडे याने १८८ आणि तन्मय पाटील याने १८७ गुण प्राप्त करून यश मिळविले आहे.विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाले असले तरी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या निकालानंतरच अभियांत्रिकी प्रवेशाला प्रवेश घेण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल येत्या १२ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यात मिळणाऱ्या गुणांच्या आधारे आयआयटी किंवा इतर राष्ट्रीय संस्थांमध्ये प्रवेश विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यशपुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या आर्मी पब्लिक स्कूलमधील सृष्टी पाटील हिला ‘एमएचटी-सीईटी’मध्ये १९९ गुण मिळाले आहेत. तिला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा आहे. या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘‘अभ्यासात सातत्य ठेवले. सीईटीचा स्वतंत्र अभ्यास केला नाही. बारावी अभ्यासाबरोबरच हा अभ्यास सुरू होता. खासगी क्लासेसही लावले होते. अकरावीमध्ये असल्यापासून डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.