शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ऑक्टोबरमध्ये ब्रिक्स परिषद, पंतप्रधानांसह चीनचे राष्ट्राध्यक्षही राहणार उपस्थित

By admin | Updated: August 16, 2016 15:45 IST

येत्या 15 व 16 आॅक्टोबर रोजी गोव्यात ब्रिक्स परिषद होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १६ -   येत्या 15 व 16 आॅक्टोबर रोजी गोव्यात ब्रिक्स परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने 14 आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी  मंगळवारी ही माहिती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका हे देश परिषदेत भाग घेणार आहेत.
ब्रिक्स परिषदेनिमित्तच्या तयारीचा आपण सर्व खात्यांकडून मंगळवारी  आढावा घेतला. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाचे एक पथक व स्वतंत्र ब्रिक्स  खातेही  स्थापन करण्यात आले आहे असे मुख्यमंत्री पार्सेकर  यांनी सांगितले.
चिनचे राष्ट्राध्यक्ष  ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. दक्षिण गोव्यातील चार पंचतारांकित हॉटेल्स त्यासाठी आरक्षित करण्यात आली आहेत. चार इस्पितळे  ब्रीक्स परिषदेप्रसंगी शस्त्रक्रिया  विभागासह  सज्ज ठेवली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.
संरक्षण खात्याची उडती रुग्णवाहिका  महनीय व्यक्तींसाठी वापरली जाईल. सुरक्षेच्या  कारणास्तव सारी उपाययोजना सुरू आहे. केंद्रातूनही प्रसंगी  सुरक्षा व्यवस्था मागविली  जाईल. आम्हाला या परिषदेच्या  आयोजनाच्या आव्हानाचे रुपांतर संधीत करायचे आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने ब्रिक्सचा आम्हाला मोठा  लाभ होईल असे मुख्यमंत्री  पार्सेकर यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)