शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर महिला कारागृहात

By admin | Updated: July 25, 2014 00:46 IST

लाचेच्या सापळ्यात २५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्या गेलेल्या अतिरिक्त विभागीय आयुक्त एस. जी. गौतम यांच्या कार्यालयातील सहायक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे

न्यायालय : अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रकरणनागपूर : लाचेच्या सापळ्यात २५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्या गेलेल्या अतिरिक्त विभागीय आयुक्त एस. जी. गौतम यांच्या कार्यालयातील सहायक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली. टिना सुरेश साजिदा ऊर्फ टिना ठाकुर (२६) रा. जरीपटका, असे या महिलेचे नाव आहे. रामटेकनजीकच्या काचूरवाही येथील शेतकरी वामन झिंगर सहारे यांचा आपला भाऊ शिवराम सहारे याच्यासोबत शेतजमिनीच्या मालकी हक्काचा वाद गौतम यांच्यापुढे सुरू होता. निकाल वामन सहारे यांच्यावतीने लावण्यासाठी टिनाने त्यांना ४० हजाराची लाच मागितली होती. २५ हजार रुपये आधी आणि उर्वरित १५ हजार रुपये निकाल लागल्यावर देण्याचे ठरले होते. या कार्यालयाच्या बाहेरील एटीएमनजीक २५ हजाराची लाच घेताना बुधवारी तिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला न्यायालयात हजर करून थेट न्यायालयीन कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीच्या वकिलाने जामीन अर्ज सादर केला. न्यायालयाने अर्जावर सरकारी वकिलाचे उत्तर मागितले. त्यांनी उत्तर दाखल करण्यास उद्या शुक्रवारपर्यंत वेळ मागितला. तो न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे उद्या या महिलेच्या जामिनावर सुनावणी होईल. तोपर्यंत तिची कारागृहाकडे रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. विलास डोंगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)गौैतम करमणूक कर शाखेतविभागीय आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार काढून घेतल्याने उपायुक्त एस.जी.गौतम करमणूक कर शाखेत त्यांच्या मूळ पदावर रुजू झाले आहेत. गौतम करमणूक शाखेचे उपायुक्त आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त आणि अलीकडेच पुनर्वसन या दोन विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. अतिरिक्त आयुक्तांच्याच कक्षातून गौतम त्यांचे कामकाज करीत होते. बुधवारी त्यांच्या कंत्राटी स्वीय सहायिकेला लाच घेताना पकडल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडून अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार काढून घेतला. त्यामुळे गुरुवारी या कक्षाला कुलूप होते. गौतम यांना करमणूक कर शाखेत नवीन कक्ष देण्यात आला आहे.