शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यभरतीच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक

By admin | Updated: May 27, 2015 01:00 IST

दोघांविरोधात गुन्हा : भरतीचे बनावट पत्र देऊन १२ जणांना गंडा

गडहिंग्लज : सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून १२ जणांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन भरतीबाबत बनावट पत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गडहिंग्लज पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल झाला. जयसिंग पालकर (रा. हरळी बुद्रक , गडहिंग्लज) आणि संदीप अर्जुन बडदे (रा. एळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांतील माहितीनुसार, हरळी बुद्रुक येथील सखाराम दत्तात्रय पाटील यांनी आपला मुलगा स्वप्निल यास फेब्रुवारी २०१४ मध्ये कवठेमहांकाळ येथे भरतीसाठी नेले होते. त्यावेळी हरळी येथील नातेवाईकांच्या भरतीसाठी आलेल्या जयसिंग पालकर यांच्याशी पाटील यांचे बोलणे झाले. यावेळी पालकर यांनी आपल्या ओळखीचे संदीप बडदे हे पैसे घेऊन मुलांना सैन्यभरती करीत असल्याचे आणि आपल्या मुलाचीही भरती केल्याचे सांगितले. त्यांच्या विश्वासावर पाटील यांनी संदीपसह मोहन तमनागोळ (रा. मलगेवाडी, ता. चंदगड) आणि अमोल पाटील (रा. वाघराळी, ता. गडहिंग्लज) यांच्या भरतीसाठीचे प्रत्येकी १ लाख प्रमाणे ३ लाख रुपये हरळी येथे पालकर यांना रोख दिले.त्यानंतर महिन्याभरात तीनही मुलांना सैन्यभरती झाल्याचे आणि भोपाळ येथे हजर होण्याचे आदेश पत्र पालकर याने आणून दिले. त्यामुळे प्रत्येकी २ लाखांप्रमाणे सहा लाख रुपये कोल्हापूर येथे बडदे यास त्यांनी दिले. तसेच अन्य कुणाला भरती करावयाचे असल्यास प्रत्येकी तीन लाख देण्यास सांगितले. त्यानंतर विशाल तोडकर (रा. हरळी बुद्रुक), अंकुश येसरे (रा. गडहिंग्लज), रफीक कुंदरगी (हलकर्णी), निखील दुबाळ (रा. धुळगाव, ता. तासगाव), रवींद्र खुळे (रा. गजरगाव), शाम गुरव (रा. गजरगाव) आणि चंद्रकांत सोले (रा. एरंडोल) अशा नऊ मुलांनी सुद्धा पालकर यांच्यामार्फत संदीप बडदे यास प्रत्येकी ३ लाखांप्रमाणे पैसे दिले.दरम्यान, आॅक्टोबर २०१४ मध्ये पत्रानुसार अहमदनगर येथे भरतीसाठी गेलेल्या संदीप पाटील यास भरतीचे पत्र बनावट असल्याचे कळल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. सखाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून जयसिंग पालकर आणि संदीप बडदे यांच्याविरोधात एकूण ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)