शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर अखेर जाळ्यात

By admin | Updated: April 30, 2016 03:22 IST

ठाणे अँटीकरप्शनच्या पथकाने शिवसेना गटनेता धनंजय गावडे यांना तब्बल २५ लाख रुपयांची लाच देताना गुरुवारी रात्री ठाणे येथील एका हॉटेलमध्ये रंगेहाथ अटक केली.

वसई : सिडकोतून प्रतिनियुक्तीवर आलेला आणि गेली आठ वर्षे वसई विरार पालिकेच्या नगररचना विभागात उपसंचालक पदावर ठाण मांडून बसलेल्या वाय. एस. रेड्डी याला ठाणे अँटीकरप्शनच्या पथकाने शिवसेना गटनेता धनंजय गावडे यांना तब्बल २५ लाख रुपयांची लाच देताना गुरुवारी रात्री ठाणे येथील एका हॉटेलमध्ये रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर वसई-विरार परिसरातील बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पालिकेतील गटनेता धनंजय गावडे यांनी नगररचना विभागातील गैरकारभाराची अनेक प्रकरणे उजेडात आणली आहे. नगररचना विभागात उपसंचालक पदावर असलेले वाय. एस. रेड्डी यांच्याविरोधात गावडे यांनी मुंबई हायकोर्टातही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या रेड्डी यांनी गावडे यांना एक कोटी रुपयांचे आमिष दाखवले होते. याप्रकरणी गावडे यांनी ठाणे अँटीकरप्शन विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक अनिल होनमाने यांनी सापळा रचला होता. गुरुवारी रात्री रेड्डी पहिला हप्ता देण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ठाणे येथील वाईन अँड डाईन या हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी रेड्डी याला २५ लाख रुपये देताना रंगेहाथ अटक केली. अटकेनंतर अँटीकरप्शनच्या पथकाने वसई येथील रेड्डी यांच्या निवासस्थानी धाड मारली. या धाडीत दोन लाख रुपये रोख रकमेव्यतिरिक्त काही हाती लागले नाही. शुक्रवारी सकाळी अंँटीकरप्शनच्या पथकाने वसई विरार पालिकेच्या मुख्यालयात असलेल्या नगररचना विभागाच्या कार्यालयावर धाड टाकून कागदपत्रांसह इतर चौकशी सुुरु केली. संध्याकाळी उशिरापर्यंत अँटीकरप्शनचे अधिकारी कार्यालयात चौकशी आणि तपास करीत असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. अंँटीकरप्शन विभागाचे एक पथक दुपारी विमानाने हैदराबाद आणि कोची येथे रवाना झाले आहे. याठिकाणी रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करून व्यवसाय सुरु केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे पथक चौकशीसाठी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गेली आठ वर्षे रेड्डी सिडकोतून प्रतिनियुक्तीवर वसई विरार महापालिकेत ठाण मांडून बसले आहेत. पालिकेने रेड्डी यांना पालिका सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया करून तसा ठरावही महासभेत संमत केला आहे. मात्र, सिडकोचे मूळ कर्मचारी असलेल्या रेड्डी यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुुरु असल्याने सिडकोने त्यांना सेवेतून सुट्टी देण्यास नकार दिला होता. त्यानंतरही रेड्डी प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. रेड्डी यांच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, राजकीय पाठबळ आणि बिल्डर लॉबीचा पाठिंबा असल्याने रेड्डी यांची बदली होत नव्हती. ठाण्यातील या कारवाईमुळे अनेक अधिकाऱ्यांना मोठा धक्का लागला असून या प्रकरणाची आणखी चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)>रेड्डी यांची वसई विरार परिसरातील बड्या बिल्डरांशी अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यातून त्यांनी अनेक बोगस कामे केलेली आहेत. त्यामुळे नगररचना विभागात कार्यरत असलेले ठेका अभियंता आणि इतर कर्मचारी यांच्याकडून महत्वाची कागदपत्रे व दस्तऐवज नष्ट केले जाण्याची भिती आहे. त्यांचा कार्यालयातील हस्तक्षेप थांबवून महत्वाची कागदपत्रे व दस्तऐवज सुरक्षित ठेवण्याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घेतली पाहिजे. रेड्डी यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार पुराव्यासह उजेडात आणणार आहोत.- धनंजय गावडे, तक्रारदार तथा शिवसेना गटनेता.