शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस शिपाई अटक * ५८ हजार उकळले : परराज्यातील वाहन पकडून कारवाईचा बहाणा

By admin | Updated: May 17, 2014 21:43 IST

नियमभंग केल्याची कारणे देत मोटार मालकाकडून ५५ हजार ५०० रुपये उकळणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.

पुणे : हरियाणा पासिंग असलेली मोटार पकडून विविध नियमभंग केल्याची कारणे देत मोटार मालकाकडून ५५ हजार ५०० रुपये उकळणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. महाराष्ट्र शासनाचा कर न भरल्याच्या कारणावरुन वाहन सोडविण्यासाठी ३ हजार ५०० रुपये आणि टॅक्सच्या नावाखाली त्याने ८ सप्टेंबर २०१३ रोजी ५५ हजार रुपये त्याने घेतले होते. शरद दिलीप थोरात (वय २८, रा. तुकाईदर्शन, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीसाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील एका व्यक्तीने लाचलुचपतकडे थोरात याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. हरियाणा पासिंगची मोटार क्र. एचआर. २६, एवाय. ४६२६ घेऊन ते कोरेगाव पार्क भागातून जात होते. कोरेगाव पार्क वाहतूक विभागामध्ये नेमणूकीस असलेला पोलीस शिपाई थोरात याने ही मोटार पकडली. मोटारीचा महाराष्ट्रातील कर भरलेला आहे का अशी विचारणा त्यांच्याकडे थोरात याने केली. हा कर भरलेला नसल्यामुळे थोरात याने मोटार कारवाई न करता सोडण्यासाठी ३ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार व्यक्तीकडून ही रक्कम स्विकारल्यानंतर मोटारीचा कर भरण्याच्या नावाखाली ५५ हजार रुपये घेतले होते. आपल्या पदाचा गैरवापर करुन तसेच शासनाचे आर्थिक नुकसान केले. याची तक्रार लाचलुचपत कडे आल्यावर चौकशी सुरु होती. चौकशीअंती त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम १३ (१)ड सह १३ (२) प्रमाणे मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.