शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास बेदम चोप

By admin | Updated: October 19, 2016 20:40 IST

शिंदेवाडी (ता. मिरज) येथे बुधवारी चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शानूर हाजीसाब शेख (वय ३८, रा. उगार, ता. अथणी, जि. बेळगाव)

ऑनलाइन लोकमतमिरज, दि. 19 - शिंदेवाडी (ता. मिरज) येथे बुधवारी चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शानूर हाजीसाब शेख (वय ३८, रा. उगार, ता. अथणी, जि. बेळगाव) या तरुणास ग्रामस्थांनी बेदम चोपले. त्याला ग्रामपंचायतीसमोर खांबाला बांधून महिलांनी चपलाने चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.शिंदेवाडी गावाजवळ असलेल्या ओढ्यावर दुपारी गावातील काही महिला धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. सर्व महिला परतल्यानंतर तीस वर्षीय विवाहिता एकटीच धुणे धूत होती. यावेळी तेथे आलेल्या शानूर शेख याने निर्जनस्थळी एकटीच महिला असल्याचे पाहून तिच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेस झुडुपात ओढून नेत असताना तिने आरडाओरड केल्याने तेथून जाणारे विनायक साळुंखे यांनी शेख यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेख याने मोटारसायकलवरून केंपवाडच्या रस्त्याने पलायन केले. साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला.केंपवाड येथेही ग्रामस्थांनी अडविल्याने शेख परत शिंदेवाडीकडे आला. गावात हायस्कूलजवळ मोटारसायकल टाकून शेतात शिरलेल्या शेखला ग्रामस्थांनी पकडले. यावेळी मोठा जमाव जमला होता. त्याला पकडून ग्रामपंचायतीजवळच्या खांबाला बांधून घालण्यात आले. गावातील महिलांनी त्याला चपलाने चोप दिला. ग्रामस्थांनीही त्याची चांगलीच धुलाई केली.पंचायत समिती सदस्य शंकर पाटील, दीपक पाटील, गोविंद पाटील, लक्ष्मण साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. शानूर शेख याच्याविरुध्द बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.दोन तास बांधून ठेवलेशानूर शेख याचा जनावरे भादरण्याचा व्यवसाय आहे. त्या निमित्ताने तो गावात आला होता. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचे हातपाय बांधून तब्बल दोन तास विद्युत खांबाला बांधून घालण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडे त्यास सोपविण्यास ग्रामस्थांनी नकार देत, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्याचा आग्रह धरला. यामुळे पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी शिंदेवाडी येथे जाऊन शानूर शेख यास ताब्यात घेतले.