शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकफेल पीएमपीमुळे प्रवाशांचा थरकाप

By admin | Updated: September 10, 2016 00:51 IST

वेळ दुपारी बाराची... शिवाजीनगरकडे जाण्यासाठी डीएसके विश्वमधील दहा ते पंधरा प्रवासी स्थानकावर लावलेल्या पीएमपी बसमध्ये बसले होते..

पुणे : वेळ दुपारी बाराची... शिवाजीनगरकडे जाण्यासाठी डीएसके विश्वमधील दहा ते पंधरा प्रवासी स्थानकावर लावलेल्या पीएमपी बसमध्ये बसले होते.. काही वेळातच गाडी निघणार असल्याने वाहकही तिकिटे फाडण्यात मग्न. अचानक गाडीचा हँडब्रेक निकामी झाल्याने गाडी चालकाविनाच उतारावर धावू लागली.. त्यामुळे गाडीतील प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांचा एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने काही अंतरावर जाऊन एका लोखंडी खांबाला धडकून ही गाडी थांबली आणि मोठा अनर्थ टळला. डीएसके विश्वमधून शिवाजीनगरकडे जाणारी बस (एमएच १२ एचबी ७०७) प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. बस निघण्यासाठी काही वेळ असल्याने बसचे चालक संतोष बत्तिसे हे गाडीचा हँडब्रेक लावून खाली उतरले होते. त्या वेळी वाहक गिरीश डोंगरे गाडीतच तिकिटे देत होते. बसमध्ये तीन-चार पुरुष आणि दहा-बारा महिला प्रवासी होत्या. अचानक गाडीचे हँडब्रेक फेल झाल्याने ही गाडी उतारारून धावू लागली.त्यामुळे चालक नसताना बस पुढे जाऊ लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. हा आरडाओरडा ऐकून चालक बत्तिसे हे प्रसंगावधान दाखवून पळत जाऊन गाडीत घुसले. त्यानंतर त्यांनी स्टिअरिंग आणि ब्रेकचा ताबा घेतला. त्या वेळी दोन्ही ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी पुढे उतारावर एक मोठा खड्डा असल्याचे त्यांना आधीच माहिती होते. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान दाखवून गाडी त्या ठिकाणी असलेल्या एका होर्डिंगच्या लोखंडी खांबाला धडकविली. त्यामुळे खड्ड्यापासून काही अंतर आधीच ही गाडी थांबली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.(प्रतिनिधी)प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्षडीएसके विश्वमधील स्थानक हे उतारावर आहे. याशिवाय या मार्गाचा रस्ता चढावर आहे. त्यामुळे या मार्गावर ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणच्या प्रवाशांकडून अनेकदा चांगल्या आणि सुस्थितीमधील गाड्या देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण, पीएमपीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे या दुर्घटनेनंतर तरी पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रत्यक्षदर्शींनी केली आहे.>चालकाच्या पायाला दुखापतगाडीतील महिलांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, चालक बत्तिसे यांच्या पायाला तसेच काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.