शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला तोडण्याचा डाव हा केवळ अपप्रचार - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: December 9, 2014 11:25 IST

मुंबईच्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप म्हणजे अपप्रचार आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप म्हणजे केवळ अपप्रचार असून असा कोणताही हेतू नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  आज हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधकांकडे या मुद्यावर अपुरी माहिती असून ते केवळ त्याच आधारे आकांडतांडव करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. 
मुंबईच्या विकास प्रक्रियेत केंद्र शासनाचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना केली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी 
रविवारी दिल्लीत झालेल्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीदरम्यान केली होती. मात्र हा प्रस्ताव म्हणजे मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई तोडण्याचा कोणताही डाव नसून हा केवळ अपप्रचार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील कोणताही प्रकल्प असो, त्याचे सर्व कायदे केंद्राशी संबंधित असल्याने लहान किंवा मोठ्या विकास प्रकल्पासाठी नेहमी केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी व मुंबईच्या हितासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच जे लोक या समितीला विरोध करतील, ते मुंबईच्या विकासाच्या विरोधात असतील अशी टीकाही त्यांनी केली.