शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळागौरीत रंगले ब्राझिलियन विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 03:02 IST

महिलांचा सामूहिक पारंपरिक सण नव्या पिढीपुढे सादर करून आपली प्राचीन परंपरा अबाधित राखण्याचा उपक्रम हाती घेतला.

अलिबाग : येथील महिलांनी एकत्र येवून मनस्विनी नामक महिला गटाची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून महिलांचा सामूहिक पारंपरिक सण नव्या पिढीपुढे सादर करून आपली प्राचीन परंपरा अबाधित राखण्याचा उपक्रम हाती घेतला. त्या अंतर्गत महिलावर्गाचा अत्यंत आवडीचा आणि आनंददायी अशा मंगळागौर सणाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत अभ्यासाकरिता आलेल्या ब्राझिलियन विद्यार्थ्यांनी देखील आनंद घेऊन ते सुखावल्याची माहिती मनस्विनी महिला गटाच्या सदस्या अनिता जोशी यांनी दिली आहे. या कार्यक्रमात ब्राझीलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून विविध खेळांमध्येही ते सहभागी झाले होते. ब्राझिलियन विद्यार्थ्यांनी झिम्मा या खेळात फुगडी घालण्याची अनुभूती घेतली. मि. गब्रियेल याच्या नेतृत्वाखाली हे ब्राझिलियन विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करीत आहेत. पारंपरिक मंगळागौरीचा सण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ब्राझीलपर्यंत पोहोचणार असल्याने सहभागी महिला देखील सुखावून गेल्या होत्या. वेदिता बुरसे हिने मंगळागौरीच्या जवळजवळ ५५ खेळांची तयारी करून घेतली होती. अ‍ॅड.स्वाती लेलेंचे निवेदन, शिल्पा कोसमकर यांचे गायन आणि अ‍ॅड.नीला तुळपुळे, माधुरी जोशी यांची साथ, धनश्री बुरसे यांचे तबलावादन यामुळे या कार्यक्र माला चांगलाच साज चढला होता. सुरुवातीला गणपती फुगडी अनिता जोशी, ज्योती मयेकर आणि वर्धन यांनी सादर करून कार्यक्र माची सुरुवात केली. नंतर साधी फुगडी, दंड फुगडी, एका हाताची, तिघींची फुगडी असे फुगडीचे विविध प्रकार खेळले गेले. आगोटा पागोटा, होडी, करवंट्या, बैलजोडी, टांगा, अगं अगं सुनबाई अशा विविध खेळांनी हा मंगळागौरीचा कार्यक्र म उत्तरोत्तर रंगत गेला. पारंपरिक मंगळागौरीबरोबरच उखाणे, स्त्री शिक्षण, लेक वाचवा अभियानविषयक संदेश देत स्त्रीशक्तीचा जागर या खेळाने कार्यक्रमाची सांगता झाली. साधना कोळगावकर, जितेश्री चौगुले, अनिता तुळपुळे, वीणा शेवडे, स्वाती कुलकर्णी, स्वाती पित्रे, सुचिता दामले, छाया शिंदे, अर्चना तिडके, स्मिता गोडबोले या महिलांसह साना तुळपुळे, तलिशा चौगुले या बालिका देखील सहभागी झाल्या होत्या. >श्रावणगौर गटमनस्विनी ग्रुपने ‘श्रावणगौर’ नावाच्या मंगळागौरीच्या खेळासाठी एक गट केला. अलिबाग शहरातील मंगळागौरीचा असा हा पहिलाच गट आहे. या गटामध्ये ४ वर्षांपासून ते ५५ वर्षे वयोगटातील हौशी महिला आणि एक छोटा गट पण सहभागी झाला होता. वेदिता बुरसे हिने मंगळागौरीच्या जवळजवळ ५५ खेळांची तयारी करून घेतली होती. अ‍ॅड.स्वाती लेलेंचे निवेदन, शिल्पा कोसमकर यांनी गायन के ले.