शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक ( फोटो स्टोरी)

By admin | Updated: August 5, 2016 16:06 IST

शुक्रवार सकाळपासूनच मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले असून वाहतूक कोंडी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.  रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  पावसाच्या जोरदार सरींमुळे वाहतुकीलाही फटका बसला असून अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. 
 
तसेच मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही विस्कळीत झाली असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. तिन्ही मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. दरम्यान  मुसळधार पावसाचा हवाई सेवेलाही फटका बसला असून दृश्यमानता कमी असल्याने विमानांचे उड्डाण अर्धा तास उशिराने होत आहे. 
 
परळ, दादर, वरळी, बोरीवली, कांदिवलीसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस होत आहे.  पालघर, वसई, विरार, ठाणे कल्याण, नवी मुंबई भागाच सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. 
 
पावसामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. जेव्हीएलआर, मुलूंड टोल नाका ते कांजूरमार्गावरही वाहतूक कोंडी झाल्यामुळे तेथील वाहतूकही धिम्या गतीने सुरु आहे.
 
सखल भागात पाणी साचल्याने सायनपासून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 
सायन-दादर दरम्यान ट्रॅकवर चार ते पाच इंच पाणी जमा झाल्याने मध्य रेल्वेची गती आणखी मंदावली आहे. 
मुंबई आणि ठाणे परिसरात पुढच्या ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
 
 
 
( सर्व फोटो - सुशिल कदम आणि अतुल कासारे यांनी काढले आहेत.  )