शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंसाठी दिल्लीत खलबते

By admin | Updated: December 4, 2015 01:16 IST

विधान परिषदेच्या ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजून एकमत झालेले नसताना मुंबईतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी

- अतुल कुलकर्णी,  मुंबईविधान परिषदेच्या ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजून एकमत झालेले नसताना मुंबईतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याविषयी दिल्लीत खलबते सुरू आहेत. राणे यांनीदेखील आपल्याला उमेदवारी दिली तर विचारपूर्वक निर्णय घेऊ, असे सांगितले; शिवाय मनसेची मते मिळविण्याची ताकद फक्त राणेंकडेच आहे हेही एक कारण त्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेचे संख्याबळ आणि याआधीच्या निवडणुकीत मतांची झालेली फाटाफूट पाहता विद्यमान आमदार भाई जगताप यांना पुन्हा संधी देणे पक्षातील काही नेत्यांना जोखमीचे वाटत आहे. तर राणे पुन्हा सक्रिय राजकारणात आले तर आपले काय, अशी भीतीही काहींच्या मनात आहे. सध्या मुंबई महापालिकेत काँग्रेस ५१, राष्ट्रवादी १४, समाजवादी पक्ष ९ असे काँग्रेसच्या बाजूने ७४ एवढे संख्याबळ आहे. तर शिवसेना ७४, भाजपा ३१ अशी १०५ बेरीज भाजपा-सेनेच्या बाजूने आहे. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ७६ मतांची गरज आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम हे पहिल्या पसंतीत निघू शकतील, असा सत्ताधाऱ्यांचा होरा आहे. या सगळ्यात मनसेची २८ मते निर्णायक ठरू शकतात. जर राणे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर शिवसेना आणखी एक उमेदवार देईल आणि कोणत्याही परिस्थितीत राणे येणार नाहीत याची व्यवस्था करेल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांना पालिकेत उमेदवारी देण्याचे आश्वासन देत त्यांची मते फोडण्याचे राजकारणही शिवसेना खेळेल, असे सांगितले जात आहे.भाई जगताप आपल्यालाच उमेदवारी मिळेल याविषयी आश्वस्त असले तरी मागील निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची ६ ते ७ मते फुटल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्याआधीच्या निवडणुकीतही काँग्रेसचे बहुमत असताना कमरुद्दीन मर्चंट यांना याच फुटीचा जोरदार फटका बसला होता. याहीवेळी जर काँग्रेसच्या मतांमध्ये फाटाफूट झाली तर मनसेची मते कामी येतील आणि काँग्रेस आपली जागा राखू शकेल, असा अंदाज बांधला जात आहे. राणेंचा विजय काँगे्रससाठी फायद्याचा असला तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राणेंचा विजय शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकतो.