शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या मुलाला धावत्या ट्रेनसमोर फेकले

By admin | Updated: January 29, 2015 05:50 IST

आपल्या मित्रांशी प्रेयसीचे होणारे बोलणे आवडत नसल्यामुळे प्रियकरानेच तिच्या चार वर्षांच्या मुलाला रविवारी रात्री जोगेश्वरी रेल्वे स्थानकात बोरीवलीच्या

मुंबई: आपल्या मित्रांशी प्रेयसीचे होणारे बोलणे आवडत नसल्यामुळे प्रियकरानेच तिच्या चार वर्षांच्या मुलाला रविवारी रात्री जोगेश्वरी रेल्वे स्थानकात बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेसमोर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली़ या घटनेत त्या चिमुरड्याला आपला उजवा हात गमवावा लागला आहे. त्याच्यावर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संदीप सहदेव बेहरे असे आरोपीचे नाव असून, तो खार येथे राहत असून व्यवसायाने तो इस्टेट एजंट आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ओळख एका घटस्फोटीत महिलेशी झाली. मालाड कुरार येथील वैजात पाड्यात ती मुलासोबत राहते. यादरम्यान संदीपशी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. ती आपल्या मित्रांशी गप्पा मारीत असे, हे संदीपला आवडत नसे. मित्रांशी बोलू नको, असा संदीपने तिला दमही दिला होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असत. रविवारी संदीप मालाड येथे तिला भेटायला आला, याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादानंतर त्याने मुलाला फिरायला नेतो असे सांगून तो घेऊन गेला. काही वेळाने संदीपने तिला रेल्वे अपघातात मुलगा जखमी असल्याचे कळविले.बोरीवली रेल्वे पोलिसांनी संदीपला चौकशीसाठी ताब्यात घेतले. संदीपनेच मालाड येथून चर्चगेट लोकल पकडून मुलाला जोगेश्वरी स्थानकात आणले. त्यानेच त्या मुलाला लोकलखाली फेकून दिल्याचे उघडकीस आले. अपघातात मुलाचा हात लोकलखाली आल्याने तुटला. हा गुन्हा मालाडमध्ये घडल्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेहरेला अटक केली. (प्रतिनिधी)