शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार

By admin | Updated: November 26, 2015 03:10 IST

राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली.

भिवंडी : राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली. बुधवारी केवळ शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर एमआयएमने काळे झेंडे दाखविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना टोले हाणताना विरोधाने शहराचा विकास होत नाही, अशा कानपिचक्या दिल्या.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) वंजारपट्टीनाका येथे बांधलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि राजीव गांधी चौक ते कल्याण रोड, साईबाबा मंदिरापर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रचारात भाजपा व शिवसेनेत झालेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षात निर्माण झालेली कटुता कमी झालेली नाही.यापूर्वीही ठाणे ग्रामीण पोलिसांच्या फिर्यादींना मुद्देमाल हस्तांतर करण्याच्या घाणेकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमातही शिवसनेने बहिष्कार टाकला होता. केडीएमसीत युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील दुरावा संपल्याचे दिसत असतांनाच बुधवारी शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने युतीत कटूता कायम असल्याचे दिसून आले. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनापाठोपाठ लंडन येथील घर ताब्यात घेण्याच्या कार्यक्रमातही शिवसेनेला डावलण्यात आले होते. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील अनेक विकास प्रकल्पांना एमएमआरडीएने कात्री लावली आहे किंवा त्यात बदल केला आहे, या संघर्षाच्या नाराजीची किनारही या बहिष्कारमागे असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कार्यक्रमात विकासकामे होत नसल्याचे कारण पुढे करून एमआयएमने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.