शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी सीमारेषा ओलांडल्या?

By admin | Updated: September 10, 2016 01:29 IST

फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे प्रारूप प्रभागरचना त्रिसदस्यीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे प्रारूप प्रभागरचना त्रिसदस्यीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. प्रारूप प्रभागरचनेत गावे, वाड्या-वस्त्या फोडण्यात आल्या आहेत. महापालिकेत सत्ता येण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खेळी खेळल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा अर्थात प्रारूप प्रभागरचना होय. गुगल अर्थच्या नकाशावर प्रगणकाचे गट बसवून प्रारूप प्रभाग रचना कराव्यात अशी सूचना निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून आदेश मिळताच रचना करून याचा आराखडा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त यांच्या समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या समितीकडून येत्या १२ सप्टेंबरला हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडे प्रारूपचा प्रस्ताव सादर होण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी प्रभागांची तोडफोड केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. २००२, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत केलेली रचना आणि २०१७ च्या निवडणुकीसाठी असणारे प्रभाग यात बदल केले आहेत. गावे, वाड्या-वस्त्या फोडण्यात आल्या आहेत. गावातील मतांचे विभाजन करणे, विभाजन केलेला भाग नवनगराला जोडून प्रभाग तयार केले आहेत. नवनगरांचा भागात भाजपाचा पॉकीट वोटर आहे. गावठाणे आणि उपनगरांचे विभाजन करून प्रस्थापित राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही मतांची खेळी खेळली जात आहे, अशी चर्चा शहरात रंगली आहे. चार सदस्यीय प्रभागांमुळे दोन जागा या महिलांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमातींमधील महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा या अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा असलेल्या प्रभागांमधून सोडतीने काढण्यात येतील. ज्या प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता दोन जागा राखीव असतील, त्या प्रभागातील एक जागा थेट नागरिकांच्या मागासप्रवगार्तील महिलांकरिता आहे. (प्रतिनिधी)>आरक्षण : पन्नास टक्के जागा महिलांसाठी२०१२ च्या निवडणुकीत मतदारसंख्या ११ लाख ५२ हजार ५८९ होती, तर मतदारयाद्यांचे शुद्धीकरण, दुबार नावे वगळणी यांमुळे १ जानेवारी २०१६ला मतदारसंख्या १० लाख ६८ हजार ३७१ इतकी खाली आली. निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करण्याची आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत नगरविकास विभागाने निश्चित केली आहे. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जागांचे आरक्षण ठरणार असून, अनुसूचित जातींसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी ३ तर इतर मागासवर्गीयांसाठी ३५ जागा असतील, असा अंदाज आहे. नगरसेवक संख्या १२८ कायम राहणार असून, प्रभागांची संख्या ३२ असणार आहे. ५० टक्के जागा महिलांसाठी आहेत.